IPL 2024 Auction: शार्दुल ठाकूरची CSK मध्ये घरवापसी, तर RCB ने सोडलेल्या हर्षल पटेलला मिळाले तब्बल 11.75 कोटी

IPL 2024 Auction: शार्दुल ठाकूरला चेन्नई सुपर किंग्सने पुन्हा आपल्या संघात सामील केले आहे.
Shardul Thakur | Harshal Patel
Shardul Thakur | Harshal PatelX/ChennaiIPL and RCBTweet

IPL 2024 Players Auction, Shardul Thakur and Harshal Patel

दुबईतील कोका-कोला एरिनामध्ये इंडियन प्रीमीयर लीग 2024 स्पर्धेसाठी मंगळवारी (19 डिसेंबर) लिलाव होत आहे. या लिलावात अनेक मोठ्या खेळाडूंची नावे रिंगणात होती. त्यातील स्टीव्ह स्मिथ, मनीष पांडे, करुण नायर अशा खेळाडूंना सुरुवातीला पसंती मिळाली नसली, तरी काही मोठ्या नावांना मोठ्या रक्कमे बोली लागली.

दरम्यान, चर्चेत असलेल्या ट्रेविस हेडला सनरायझर्स हैदराबादने 6.80 कोटीला खरेदी केले, तर रचिन रविंद्रला चेन्नई सुपर किंग्सने 1.80 कोटी रुपयांना खरेदी करत संघात घेतले. याशिवाय भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरही या लिलावात होता. त्याला चेन्नई सुपर किंग्सने 4 कोटी रुपयांना खरेदी केले आहे.

Shardul Thakur | Harshal Patel
धोनी-जड्डूची दोस्ती ते गिलची शतकं; IPL 2023 मधील 7 अविस्मरणीय क्षण

दरम्यान, ही शार्दुल ठाकूरची घरवापसी आहे. त्याने चेन्नईकडून 2018 ते 2021 दरम्यान आयपीएल खेळला आहे. त्यानंतर त्याला चेन्नईने करारमुक्त केले होते.

त्यामुळे ते 2022 चा आयपीएल हंगाम दिल्ली कॅपिटल्सकडून आणि 2023 चा हंगाम कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला होता. त्यानंतर आता 2024 हंगामाच्या लिलावात त्याने त्याचे नाव नोंदवले होते. या लिलावात चेन्नईने पुन्हा त्याला संघात घेतले.

Shardul Thakur | Harshal Patel
IPL 2024 Auction: रोहित शर्मा MI सोडून दुसऱ्या फ्रँचायझीकडे जाऊ शकतो का? जाणून घ्या काय आहेत लिलावनंतर ट्रेडचे नियम

तसेच या लिलावात आणखी एक भारतीय खेळाडूचे नाव चर्चेत होते. हे नाव म्हणजे अष्टपैलू हर्षल पटेल. तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. त्याने 99 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र हर्षल पटेलला या लिलावापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने करारमुक्त केले होते. त्यामुळे तो या लिलावात उतरला.

लिलावात त्यालाही घेण्यासाठी फ्रँचायझींमध्ये चुरस दिसून आली. अखेर पंजाब किंग्सने त्याची बोली जिंकली आणि त्याला संघात घेतले. पंजाबने हर्षल पटेलला संघात घेण्यासाठी तब्बल 11.75 कोटी रुपये मोजले. त्यामुळे तो आयपीएल 2024 स्पर्धेत पंजाबकडून खेळताना दिसेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com