Rachin Ravindra ICC
क्रीडा

Rachin Ravindra: सचिनच्या मुंबईत आता घुमणार 'रचिन रचिन'! वडील म्हणाले, 'जुन्या आठवणी...'

World Cup 2023: वर्ल्डकपमध्ये रचिन रविंद्रने केलेल्या कामगिरीबद्दल त्याच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

World Cup 2023, Rachin Ravindra:

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत बुधवारी (१५ नोव्हेंबर) भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना पार पडणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना होणार आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा युवा क्रिकेटपटू रचिन रविंद्रकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

रचिनने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये शानदार खेळ करत आहे. तो सर्वाधिक धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावरही आहे. त्याने ९ सामन्यात ५६५ धावा केल्या आहेत, याशिवाय तीन शतकेही केली आहेत.

आता रचिन मुंबईला भारताविरुद्ध उपांत्य सामना खेळणार आहे. विशेष म्हणजे रचिन नाव सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.

त्यातच सचिनचं घरचं मैदान असलेल्या वानखेडे स्टेडियमवर रचिन त्याच्या कारकिर्दीतील वर्ल्डकपचा पहिला उपांत्य सामना खेळणार आहे. याबद्दल त्याच्या वडीलांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

रचिनचे वडील रवी कृष्णमुर्ती हे मुळचे बंगळुरूतील आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर असलेले कृष्णमुर्ती यांनी आपले बालपण आणि तारुण्यातील काही वर्षे बंगळुरुमध्ये घालवल्यानंतर ९० च्या दशकात ते न्यूझीलंडमधील वेलिंग्टनला स्थायिक झाले. तिथेच रचिनचा जन्म झाला.

पुढे रचिनला त्यांनीच क्रिकेटचे धडे दिले. रचिनही आधून मधून बंगळुरूला येतो. तिथे त्याचे आजी-आजोबा आहेत.

दरम्यान, वर्ल्डकप सुरू असताना कृष्णमुर्ती आपल्या मुलाचा सामना पाहायला बंगळुरूला आले होते. येथे न्यूझीलंडने दोन सामने खेळले. विशेष म्हणजे रचिनने पाकिस्तानविरुद्ध शतकी खेळीही या मैदानावर साकारली.

त्यावेळी बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रचिनच्या नावाचा जयघोष होत होता. त्याक्षणी कृष्णमुर्ती यांच्यासाठी वेगळ्याच भावना होत्या, ज्या स्टेडियमवर काही वर्षांपूर्वी त्यांनी सचिन, सचिन असा गजर ऐकला होता, त्याच स्टेडियमवर त्यांच्या मुलाच्या नावाचाही गजर होत होता.

कृष्णमुर्ती यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की 'एक वेगळा आणि खूप भारावून टाकणारा अनुभव होता. स्टेडियममधील जयघोष ऐकून माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या.'

'बाकीच्यांप्रमाणे मलाही सचिन तेंडुलकरची महानता अनुभवण्याची संधी मिळाली आणि मीही त्या लोकांमध्ये होतो, ज्यांनी सचिनच्या नावाचा स्टेडियममध्ये जयघोष केला आहे. रचिनच्या नावाच्या जयघोषाने मला सचिनने केलेल्या मेहनतीची आणि त्याच्या दर्जाची पुन्हा आठवण झाली.'

दरम्यान, रचिनला जेव्हा त्याचे वडील बंगळुरूला घेऊन यायचे, तेव्हाही त्याचे क्रिकटचे ट्रेनिंग सुरू असायचे. त्यावेळी स्थानिक प्रशिक्षक त्याला प्रशिक्षण द्यायचे. कृष्णमुर्ती यांनी सांगितले की त्यांनी जगभरातील विविध दिग्गज खेळाडूंच्या शैलीची प्रेरणा घेत रचिनला प्रशिक्षण दिले.

रचिन बरेच तास क्रिकेट पाहायचा. तो जेव्हा लहानाचा मोठा होत होता, तेव्हा त्याने सचिन, तेंडुलकर, राहुल द्रविड, ब्रायन लारा, रिकी पाँटिंग यांसारख्या अनेक दिग्गजांना क्रिकेट खेळताना पाहिले. त्यातून तो बऱ्याच गोष्टी शिकला. आता हाच रचिन त्याच्या कारकिर्दीतील एक मोठा सामना खेळण्यासाठी सज्ज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ट्रेनमध्ये भारतीय जवानाचा खून; चादरच्या वादातून साबरमती एक्सप्रेसमध्ये घडली घटना

"... म्हणून मी मांसाहार सोडला", आरोग्यमंत्री विश्वजित राणेंचा भावनिक खुलासा; Watch Video

Goa Politics: मंत्रीपद देतो म्हटलं की धावत येतील, विरोधकांच्या एकीचा उपयोग होणार नाही, 2027 मध्ये गोव्यात भाजपचीच सत्ता; विश्वजीत राणे

Cricket Controversy: "आपसी रंजिश, गुस्सा और खराब भाषा..." ज्युनियर्सवर हल्ल्याच्या आरोपानंतर बांगलादेशी कर्णधाराचा मोठा खुलासा, पोस्ट करत म्हणाली...

मोठा आवाज, टिंटेड गाडी आणि जीवघेणी स्टंटबाजी! गोव्यात प्रसिद्ध इन्फ्लुएंसरची मॉडिफाईड BMW जप्त

SCROLL FOR NEXT