IPL 2022 : काल मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या IPL 2022 च्या 11व्या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा 54 धावांनी पराभव केला. त्यानंतर IPL 2022 मध्ये प्रत्येक खेळाडूचे लक्ष असणाऱ्या ऑरेंज कॅप आणि परपल कॅपच्या यादीत देखील बदल झाला. कालचा सामना रोमांचकारी झाला. यावेळी चेन्नईने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजी दिली. यावर पंजाबने फलंदाजी करताना 180 धावा केल्या. तर चेन्नई सुपर किंग्सचा डाव अवघ्या 126 धावात गुंडाळला. यावेळी चेन्नईकडून शिवन दुबेने सर्वाधिक 57 धावांची खेळी केली. त्यामुळे ऑरेंज कॅप आणि परपर कॅपच्या यादीत बदल झालाय. बदल झालेल्या यादीत पंजाबचा लिविंगस्टन आणि चेन्नईच्या शिवम दुबे यांची एंट्री झाली आहे. यामुळे ऑरेंज कॅप घेण्यासाठी धडपडताना आता 5 जण दिसणार आहेत. (IPL 2022: Race for the Orange and Purple Caps)
IPL सुरु झाले की क्रिकेट पटूंसह चाहत्यांचं लक्ष ही फक्त ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. मात्र यात सतत बदल होत असतात.
ऑरेंज कॅपच्या शर्यतीतील टॉप पाच फलंदाज
इशान किशन 135
जोस बटलर 135
शिवम दुबे 109
लियाम लिविंगस्टोन 98
आंद्रे रसेल 95
तर फलंदाजीप्रमाणे IPL सर्वाधिक विकेट काढणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप दिली जाते. यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) उमेश यादव आघाडीवर असून त्याने सर्वाधिक 8 विकेट घेतल्या आहेत.
पर्पल कॅपच्या शर्यतीतील टॉप पाच गोलंदाज
उमेश यादव 8 59
राहुल चहर 6 60
युझवेंद्र चहल 5 48
मोहम्मद शमी 5 55
टीम साऊदी 5 56
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.