R Ashwin | KL Rahul Dainik Gomantak
क्रीडा

World Cup खेळलेल्या वयस्कर भारतीय क्रिकेटर्सच्या यादीत अश्विन टॉप-5 मध्ये, धोनी दुसऱ्या क्रमांकावर

World Cup 2023: भारताकडून वर्ल्डकप खेळणारे 5 वयस्कर खेळाडू कोण आहेत, जाणून घ्या.

Pranali Kodre

Oldest Indian cricketer to play Cricket ODI World Cup:

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेसाठी सहभागी देशांना आपापल्या संघांतील खेळाडूंची नावे सुपूर्त करण्यासाठी अखेरच्या काही क्षण राहिले असताना भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला. दुखापतग्रस्त अक्षर पटेलच्या जागेवर अनुभवी फिरकीपटू आर अश्विनला भारताच्या १५ जणांच्या संघात स्थान देण्यात आले.

त्यामुळे आता अश्विनच्या नावावर एक मोठा विक्रम होणार आहे. अश्विनला जर वर्ल्डकपमधील ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात भारताकडून प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली, किंवा त्यानंतर होणाऱ्या सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली तर तो वनडे वर्ल्डकप खेळणारा भारताचा पाचव्या क्रमांकाचा सर्वात वयस्कर खेळाडू ठरणार आहे.

३७ वर्षीय अश्विनपूर्वी भारताकडून चार असे खेळाडू आहेत ज्यांनी वयाच्या ३७ व्या वर्षानंतरही वर्ल्डकपमध्ये सामने खेळले. भारताकडून वर्ल्डकप खेळणारा सर्वात वयस्कर खेळाडू होण्याचा विक्रम सध्या सुनील गावसकर यांच्या नावावर आहे. त्यांनी १९८७ साली अखेरचा वर्ल्डकप सामना खेळला होता. त्यावेळी त्यांचे वय 38 वर्षे ११८ वर्षे होते.

त्यानंतर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर एमएस धोनी असून त्याने २०१९ वर्ल्डकपमध्ये अखेरचा सामना खेळला, तेव्हा त्याचे वय ३८ वर्षे २ दिवस इतके होते. तसेच तिसऱ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर असून त्याने २०११ वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळलेला, तेव्हा त्याचे वय ३७ वर्षे ३४३ दिवस होते.

चौथ्या क्रमांकावर फारुख इंजिनियर हे असून त्यांनी सर्वात पहिल्या म्हणजेच १९७५ सालचा वर्ल्डकप खेळला होता. त्यांनी या वर्ल्डकपमध्ये अखेरचा सामना खेळला, तेव्हा त्यांचे वय ३७ वर्षे १०९ दिवस इतके होते.

तसेच आता या यादीत अश्विन पाचव्या क्रमांकावर येऊ शकतो. सध्या म्हणजे ३ ऑक्टोबर रोजी अश्विनचे वय ३७ वर्षे १६ दिवस आहे, त्यामुळे जर तो ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना खेळला, तर त्याचे वय ३७ वर्षे २१ दिवस असेल.

दरम्यान, अश्विन यापूर्वी २०११ आणि २०१५ वनडे वर्ल्डकप खेळला आहे. तसेच तो २०११ वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाचा भागही होता. त्यामुळे यंदा तो त्याचा तिसरा वनडे वर्ल्डकप खेळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

India vs Pakistan: पाकड्यांचा पराभव अटळ! हेड-टू-हेड आकडेवारीत टीम इंडियाचा वरचष्मा, सूर्याची 'ब्लू आर्मी' करणार कमाल

Sanquelim Market Robbery: फसवणुकीचा नवा फंडा! साखळीत वृद्ध भाजीविक्रेत्या महिलेला दिवसाढवळ्या लुबाडले, लंपास केली सोन्याची पाटली आणि साखळी

Sonam Wangchuck Arrested: लेह हिंसाचारानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना 'NSA' अंतर्गत अटक

SCROLL FOR NEXT