R Ashwin AFP
क्रीडा

IND vs ENG: टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! अश्विन पुन्हा झाला संघात सामील, चौथ्या दिवशी उतरणार मैदानात

R Ashwin rejoins Team India: कुटुंबात उद्भवलेल्या मेडिकल एमर्जन्सीमुळे घरी परतलेला आर अश्विन पुन्हा भारतीय संघात सामील झाला असून इंग्लंडविरुद्ध राजकोट कसोटीतील उर्वरित खेळात सहभागी होणार आहे.

Pranali Kodre

R Ashwin rejoin Team India from Day 4 of the 3rd Test against England in Rajkot:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना गुरुवारपासून सुरू झाला आहे. राजकोटला सुरू असलेल्या या सामन्यादरम्यान भारतीय संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

या सौमन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होण्याआधी भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन संघात सामील झाला आहे. याबाबत बीसीसीआयने माहिती दिली आहे.

अश्विनला या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले होते. तो पहिल्या दोन दिवशी भारताकडून खेळलाही होता. परंतु, दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर कुटुंबात मेडिकल एमर्जन्सी आल्याने त्याला तातडीने चेन्नईला परतावे लागले होते.

त्यामुळे त्याने या कसोटी मालिकेतून तात्काळ माघार घेतल्याचे बीसीसीआयने सांगितले होते. त्यामुळे तो तिसऱ्या दिवशी मैदानावर दिसला नव्हता. भारतीय संघाकडून चार गोलंदाजांनी गोलंदाजी केली होती.

मात्र, अश्विन घरी जाऊन आल्यानंतर आता पुन्हा चौथ्या दिवशी भारतीय संघात सामील होत असून मैदानावर उतरण्यासही सज्ज आहे.

दरम्यान आता चौथ्या दिवसाच्या खेळापूर्वी बीसीसीआयने प्रसिद्धी पत्रकात माहिती दिली आहे की 'आर अश्विन आणि संघव्यवस्थापनला हे सांगण्यात आनंद होत आहे की अश्विन चौथ्या दिवशी मैदानात उतरण्यास आणि संघासाठी चालू कसोटीत योगदान देण्यास सज्ज आहे.'

तसेच कुटुंबाला प्राधान्य देण्याचे महत्त्व संघव्यवस्थापन, खेळाडू, मीडिया आणि चाहत्यांनी समजून घेतल्याबद्दल बीसीसीआयने आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान, या कठीण काळात खाजगी आयुष्याचा आदर केला जावा, अशी विनंती अश्विन आणि त्याच्या कुटुंबाने केली आहे.

अश्विनने पूर्ण केल्या 500 विकेट्स

या सामन्यात घरी जाण्यापूर्वी भारताकडून पहिल्या डावात गोलंदाजी करताना अश्विनने एक विकेट घेतली होती. यासह त्याने कसोटी कारकिर्दीत 500 विकेट्स पूर्ण केल्या होत्या.

तो 500 विकेट्स घेणारा जगातील नववा क्रिकेटपटू आहे, तर भारताचा दुसराच गोलंदाज आहे. यापूर्वी भारताकडून केवळ अनिल कुंबळेने (619 विकेट्स) हा टप्पा पार केला होता.

तसेट अश्विनने 98 व्या कसोटीत 500 विकेट्सचा टप्पा पार केल्याने. तो सर्वात जलद 500 कसोटी विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. त्याच्यापुढे केवळ मुथय्या मुरलीधरन (87 सामने) आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drugs Case: तपासाची चक्रे फिरली अन् 'सुसान' जाळ्यात अडकली! वार्का ड्रग्ज प्रकरणाला 'आंतरराष्ट्रीय' वळण; अमेरिकन महिलेला गोव्यात बेड्या

Goa Night Club Fire: 'फायर अलार्म' वाजलाच नाही'! आर्थिक फायद्यासाठी लुथरा बंधूंचा लोकांच्या जीवाशी खेळ; सरकारी पक्षाचा गंभीर आरोप

Goa Night Club Fire: 'क्लबमध्ये ‘पायरो’ पेटवणारे अजूनही मोकाटच!', लुथरा बंधूंच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण; 5 फेब्रुवारीला फैसला

Tuyem Government Hospital: तुये इस्पितळासाठी 'फास्ट ट्रॅक' तयारी! कंत्राटी कर्मचारी भरतीचाही मार्ग मोकळा; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

Goa Crime: बायकोच्या निधनाचा धक्का असह्य, अवघ्या 24 तासांत नवऱ्यानही संपवलं जीवन; उत्तर प्रदेशच्या दाम्पत्याचा गोव्यात दुर्दैवी अंत

SCROLL FOR NEXT