R Ashwin 5 Wickets X/BCCI
क्रीडा

R Ashwin 5 Wickets: अर्ध्या इंग्लंड संघाला माघारी धाडत अश्विनची कुंबळेशी बरोबरी, आता नजर वॉर्न-हॅडलीच्या विक्रमावर

India vs England, 4th Test: रांचीमध्ये सुरू असलेल्या कसोटी सामन्यात आर अश्विनने 5 विकेट्स घेत अनिल कुंबळेच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

Pranali Kodre

R Ashwin 5 Wickets haul during India vs England, Ranchi Test:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या चालू असलेल्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यावेळी आर अश्विनने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. रांचीमध्ये चालू असलेल्या या कसोटी सामन्यात अश्विनने दुसऱ्या डावात 5 विकेट्स घेत मोठा पराक्रम केला.

या सामन्यात तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचा डाव 307 धावांवर संपल्यानंतर इंग्लंड संघ दुसऱ्या डावात फलंदाजीला उतरला होता. यावेळी मात्र भारतीय फिरकीपटूंचे वर्चस्व दिसून आले. इंग्लंडला पहिले दोन धक्के अश्विनने दिले. त्याने पाचव्या षटकात सलग दोन चेंडूवर बेन डकेट आणि ऑली पोप यांना बाहेरचा रस्ता दाखवला.

त्यानंतर पहिल्या डावातील शतकवीर जो रुटलाही त्याने बाद करत भारताला मोठे यश मिळवून दिले.

यानंतर कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा यांनी इंग्लंडच्या मधल्या फळीला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवल्यानंतर अखेरीस अश्विनने बेन फोक्स आणि जेम्स अँडरसन यांना बाद करत पाच विकेट्स तर पूर्ण केल्याच, त्याबरोबर त्याने इंग्लंडचा डावही 53.5 षटकात 145 धावांवर संपवला.

दरम्यान, अश्विनने या डावात 15.5 षटके गोलंदाजी करताना 51 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. अश्विनने कसोटीत एका डावात 5 विकेट्स घेण्याची ही 35 वी वेळ आहे. त्यामुळे कसोटीत सर्वाधिक वेळा एका डावात 5 विकेट्स घेणाऱ्या दिग्गज गोलंदाजांच्या यादीत अश्विनने अनिल कुंबळेची बरोबरी केली आहे.

त्यामुळे या विक्रमाच्या यादीत आता कुंबळे आणि अश्विन संयुक्तरित्या चौथ्या क्रमांकावर आहेत. या यादीत अव्वल क्रमांकावर मुथय्या मुरलीधरन आहे. त्याने कसोटीत 67 वेळा डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.

त्यापाठोपाठ शेन वॉर्न आणि सर रिचर्ड हॅडली आहेत. वॉर्नने 37 वेळा, तर हॅडली यांनी 36 वेळा एका कसोटी डावात 5 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. दरम्यान, मुरलीधरनचा विक्रम मोडणे सध्या तरी कठीण असले, तरी अश्विनची नजर आता हॅडली आणि वॉर्न यांना मागे टाकण्यावर असेल.

कसोटीत सर्वाधिकवेळा डावात 5 विकेट्स घेणारे गोलंदाज

  • 67 वेळा- मुथय्या मुरलीधरन

  • 37 वेळा - शेन वॉर्न

  • 36 वेळा - सर रिचर्ड हॅडली

  • 35 वेळा - आर अश्विन

  • 35वेळा - अनिल कुंबळे

  • 34 वेळा - रंगना हेराथ

याच डावात अश्विनने भारतात कसोटीमध्ये 350 धावांचा टप्पाही ओलांडला आहे. त्यामुळे त्याने भारतात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्येही कुंबळेला मागे टाकले आहे. अश्विनच्या भारतात 115 डावात 354 कसोटी विकेट्स झाल्या आहेत. तसेच कुंबळेने भारतात 115 डावातच 350 विकेट्स घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT