Quinton de Kock: Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: डी कॉकची शानदार कामगिरी; एका झटक्यात मोडला कॅलिस-डिव्हिलियर्सचा वर्ल्ड रेकॉर्ड!

Manish Jadhav

World Cup 2023: दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये आपली किलर कामगिरी सुरु ठेवली आहे. आता त्याने न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावले आहे.

सलामीवीर म्हणून आलेल्या डी कॉकने 116 चेंडूत 114 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 10 चौकार आणि 3 षटकार मारले. सध्याच्या विश्वचषकात डी कॉकचे हे चौथे शतक आहे. यासोबतच डी कॉकने त्याच्या वनडे कारकिर्दीतील 21वे शतक झळकावले आहे.

त्याने पुन्हा एकदा विक्रमांची झेप घेतली आहे. त्याच्या हातून घडलेल्या तीन मोठ्या विक्रमांबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

दरम्यान, डी कॉक दक्षिण आफ्रिकेसाठी (South Africa) विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने आतापर्यंत 545 धावा केल्या आहेत. त्याने माजी दिग्गज क्रिकेटपटू जॅक कॅलिस आणि एबी डिव्हिलियर्सचे विक्रम एकाच फटक्यात मोडले.

कॅलिसने 2007 च्या विश्वचषकात 485 धावा जोडल्या होत्या. तर 2015 च्या विश्वचषकात डिव्हिलियर्सने 482 धावा जोडल्या होत्या. त्याच्यापाठोपाठ माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ (2007) आणि माजी फलंदाज पीटर कर्स्टन (1992) यांचा क्रमांक लागतो, ज्यांनी अनुक्रमे 443 आणि 410 धावा केल्या होत्या.

याशिवाय, डी कॉक हा दक्षिण आफ्रिकेसाठी विश्वचषकाच्या एकाच आवृत्तीत सर्वाधिक शतके करणारा खेळाडू ठरला आहे. एकूण यादीत त्याने 2015 विश्वचषकात चार शतके झळकावणाऱ्या श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराची बरोबरी केली आहे.

एका आवृत्तीत सर्वाधिक शतकांचा विक्रम 'हिटमॅन' रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर आहे. 2019 च्या विश्वचषकात त्याने पाच शतके झळकावली होती. मार्क वॉ (1996), सौरव गांगुली (2003), मॅथ्यू हेडन (2007) आणि डेव्हिड वॉर्नर (2019) यांनी प्रत्येकी तीन शतके झळकावण्याचा पराक्रम केला.

दुसरीकडे, डी कॉक दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वाधिक एकदिवसीय शतके झळकावणारा संयुक्त तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्याशिवाय हर्षल गिब्सने आपल्या कारकिर्दीत 21 शतके झळकावली आहेत.

त्याच्यानंतर कॅलिस (17) आहे. या यादीत माजी दिग्गज फलंदाज हाशिम आमला पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 27 वनडे शतके झळकावली. डिव्हिलियर्स (25) दुसऱ्या स्थानावर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

Mhadei Water Dispute: म्हादईवर वक्रदृष्टी कायम! कर्नाटक सरकारच्या 'करनाटकी वृत्ती'वर पर्यावरणप्रेमी केरकर स्पष्टच बोलले

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

Saint Estevam Accident: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी मित्र कल्पराज आणि प्रेयसीची दोन तास चौकशी; पोलिसांकडून प्रश्नांची सरबत्ती!

SCROLL FOR NEXT