World Cup 2023: रॅसी व्हॅन डेर डुसेन आणि क्विंटन डी कॉकचे तूफानी 'शतक', आफ्रिकेच्या 350+ धावा

World Cup 2023: नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकन संघाने चार विकेट गमावून 357 धावा केल्या आहेत.
Rassie Van Der Dussen & quinton de kock
Rassie Van Der Dussen & quinton de kockTwitter/ @ICC
Published on
Updated on

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 32वा सामना न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकन संघाने चार विकेट गमावून 357 धावा केल्या आहेत.

आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना सलग एकदिवसीय सामन्यांमध्ये 300 हून अधिक धावा करण्याची ही आठवी वेळ आहे. सामन्यादरम्यान आफ्रिकेच्या फलंदाजांकडून पुन्हा एकदा उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळाली.

तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करणार्‍या रॅसी व्हॅन डेर डुसेनने शानदार शतक झळकावत 130 धावा काढल्या. त्याच्याशिवाय क्विंटन डी कॉकने चालू हंगामात आणखी एक शतक झळकावले. त्याने डावाला सुरुवात करत 114 धावा केल्या.

दरम्यान, पुण्यात (Pune) नाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार टेम्बा बावुमा (24) डी कॉकसोबत आफ्रिकन संघाच्या डावाची सुरुवात करण्यासाठी आला. या दोन्ही सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी 8.3 षटकांत 38 धावा जोडल्या.

दरम्यान, मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बावुमा किवी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टचा बळी ठरला. बोल्टने त्याला मिशेलकरवी झेलबाद करुन पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. संघाला दुसरा धक्का डी कॉकच्या रुपाने बसला. तो 114 धावा काढून बाद झाला.

डी कॉकची विकेट साऊदीने घेतली. आफ्रिकेचा तिसरा फलंदाज म्हणून रॅसी व्हॅन डेर डुसेन बाद झाला. बाद होण्यापूर्वी त्याने 118 चेंडूत शानदार शतक झळकावले. यादरम्यान त्याच्या बॅटमधून नऊ चौकार आणि पाच षटकार आले.

या फलंदाजांशिवाय चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या डेव्हिड मिलरने 29 चेंडूत 53 धावा केल्या तर पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या हेन्रिच क्लासेनला सात चेंडूत 15 धावा करता आल्या.

Rassie Van Der Dussen & quinton de kock
World Cup 2023: न्यूझीलंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू ठरला 'बेस्ट फील्डर'; किंग कोहलीला सोडले मागे

रोहित शर्माच्या विक्रमापासून एक पाऊल दूर

दरम्यान, क्विंटन डी कॉकने 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत चार शतके झळकावली आहेत. त्याचवेळी, या स्पर्धेच्या एकाच मोसमात सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत तो आता केवळ रोहित शर्माच्या (Rohit Sharma) मागे आहे.

उर्वरित सामन्यांमध्ये त्याने आणखी एक शतक झळकावल्यास तो रोहित शर्माच्या पाच शतकांची बरोबरी करेल. दक्षिण आफ्रिका आपला 7वा सामना खेळत आहे. त्याला अजून लीग टप्प्यात दोन सामने खेळायचे आहेत.

मग जर संघ उपांत्य फेरी किंवा अंतिम फेरीत पोहोचला तर त्याला तिथेही दोन सामने खेळावे लागतील. अशा स्थितीत आता डी कॉकचा फॉर्म पाहता तो रोहितचा विक्रम मोडू शकेल असे वाटते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com