Navy Chief Admiral R Hari Kumar, PV Sindhu Dainik Gomantak
क्रीडा

Navy Day: 'पीव्ही सिंधू नौदलासाठी करते नारी शक्तीचे प्रतिनिधित्व', ऍडमिरलांकडून कौतुक

नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार यांनी पीव्ही सिंधूचे कौतुक केले आहे.

Pranali Kodre

रविवारी (4 डिसेंबर) भारतीय नौदल दिवस साजरा केला जात आहे. त्यामुळे सोहळ्यापूर्वी नौदलाच्या मॅरेथॉनपटूंनी 1500 किमीचे अंतर पूर्ण केले आहे. हे अंतर पूर्ण केलेल्या मॅरेथॉनपटूंचे नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार आणि नौदल कर्मचारी उपप्रमुख व्हाईस ऍडमिरल एसएन घोरमाडे यांच्यासह बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू यांनी स्वागत केले.

या कार्यक्रमात बोलताना नौसेना प्रमुख एडमिरल आर हरि कुमार यांनी सिंधू नौदलासाठी (Indian Navy) नारी शक्तीचे प्रतिनिधित्व करते, असे म्हणत कौतुक केले आहे. पीव्ही सिंधू भारतासाठी दोन वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली आणि एकमेव महिला खेळाडू आहे.

हरी कुमार मॅरेथॉनबद्दल म्हणाले, 'धावण्यामागे शारिरीक तंदुरुस्तीबद्दल जागृती आणि नौदलाबद्दल संदेश पसरवण्याचे ध्येय होते. यांसारखे क्रार्यक्रम आपली शारिरीक तंदुरुस्ती आणि सहनशक्ती यांची परीक्षा पाहातात आणि सामर्थ्य विकसित करतात. चांगली तंदुरुस्ती असलेला व्यक्ती नैसिर्गिकपणे देशाचे रक्षण करण्यास सक्षम असतो.'

याशिवाय हरी कुमार पीव्ही सिंधूबद्दल (PV Sindhu) म्हणाले, 'पीव्ही सिंधू नौदलासाठी नारी शक्तीचे आणि सशस्त्र दलांसाठी महत्त्वाच्या असलेल्या शारीरिक तंदुरुस्तीच्या सर्व घटकांचे प्रतिनिधित्व करते. आम्ही तिच्याकडे आमची ब्रँड अम्बेसिडर म्हणून पाहातो, जी आमच्या कर्मचाऱ्यांना आणखी चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहीत करते.'

त्याचबरोबर पीव्ही सिंधू म्हणाली, 'इथे येणे आणि अशा कार्यक्रमात सहभागी होणे, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. नौदलाचे कर्मचारी जी मेहनत करतात, ती सोपी नाही. मेहनत ही यशाची गुरुकिल्ली आहे. नौदलात आणि लष्करात शिस्तीला सर्वाधिक महत्त्व आहे.'

महत्त्वाचे म्हणजे 1500 किमी शर्यत (35 दिवसातील 35 मॅरेथॉन) ही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि नौदल दिवस म्हणून सुरू करण्यात आलेली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Land Scam: गोव्यातील बनावट पॉवर ऑफ ॲटर्नीचा खेळ खल्लास! SIT च्या धाकाने भूमाफिया पळाले; मुख्यमंत्री सावंतांचा दावा

Fatima Sana Shaikh In Goa: 20 मिनिटांचा संघर्ष अन् 'ती' धाडसी उडी! 'दंगल' गर्लचा गोव्यात थरार, फातिमा सना शेखचा Video Viral

Virat Kohli Viral Post: विराट कोहलीचा दोन वर्षांनंतर मोठा निर्णय; सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टनं खळबळ!

Mandovi Bridge: मांडवी पुलावर 'नो एन्ट्री'! 11 जानेवारीला 'या' वेळेत नव्या आणि जुन्या पुलावरून वाहतूक पूर्णपणे बंद

Raia Fire News: ..आणि बघता बघता डोंगरच पेटला! राय येथील घटना; अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न

SCROLL FOR NEXT