Goa Cricket Dainik Gomantak
क्रीडा

Goa Cricket:गोव्याचे पंजाबसमोर लोटांगण

केवळ देवनकुमारची झुंज अन् पंजाबला विजयाची चाहूल

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: सलामीचा देवनकुमार चित्तेम याचा अपवाद वगळता गोव्याच्या इतर फलंदाजांनी पंजाबच्या गोलंदाजीसमोर सपशेल नमते घेतले, त्यामुळे 19 वर्षांखालील कुचबिहार करंडक क्रिकेट सामन्यात पाहुण्या संघाला रविवारी सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी विजयाची चाहूल लागली.

(Punjab won the Cuchbehar Karandak cricket match by defeating Goa)

सांगे येथील जीसीए मैदानावर सुरू असलेल्या चार दिवसीय लढतीत पंजाबने रविवारी सकाळच्या सत्रात कालच्या 7 बाद 342 वरून पहिल्या डावात सर्वबाद 432 धावा केल्या. गोव्याचा कर्णधार फिरकी गोलंदाज दीप कसवणकर याने 161 धावांच्या मोबदल्यात 7 गडी टिपले. त्यानंतर दिवसअखेर गोव्याची 9 बाद 177 अशी स्थिती झाली.

पुंडलिक नाईक जायबंदी आहे, त्यामुळे तो सोमवारी सकाळी फलंदाजीस उतरला नाही, तर पंजाबने फॉलोऑन लादल्यास गोव्याला लगेच दुसऱ्या डावास सुरवात करावी लागेल. यजमान संघ सध्या 255 धावांनी मागे आहे.

पंजाबचा डावखुरा फिरकी गोलंदाज रमणदीप सिंग याने गोव्याचा सलामी फलंदाज आर्यन नार्वेकर याला शून्यावर पायचीत बाद केले. त्यानंतर देवेनकुमार याने इझान शेख याच्यासमवेत किल्ला लढविताना दुसऱ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली. इझान बाद झाल्यानंतर गोव्याचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले.

चांगली फलंदाजी करणारा देवनकुमारला आर्यन यादव याने स्वतःच्याच गोलंदाजीवर टिपल्यामुळे गोव्याला मोठा धक्का बसला. त्याने 88 चेंडूंत 13 चौकारांच्या मदतीने 70 धावा केल्या. त्या खालोखाल वर्धन मिस्कीन याच्या 29 धावा गोव्याच्या डावात सर्वाधिक ठरल्या.

पंजाबचे शेपूट वळवळले

पंजाबच्या पहिल्या डावात कालचे नाबाद फलंदाज ईश राव (43) व क्रिश भगत (50) यांनी रविवारी सकाळी प्रतिआक्रमण करताना गोव्याच्या गोलंदाजांना सतावले. त्यांनी आठव्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी केली, त्यामुळे पंजाबला सव्वाचारशे धावांचा टप्पा ओलांडता आला. दीप कसवणकर याने ईश याला बाद करून डोकेदुखी ठरलेली जोडी फोडली. त्यानंतर गोव्याच्या कर्णधाराने आणखी दोन गडी बाद करत पाहुणा संघ साडेचारशे धावांच्या पार जाणार नाही याची दक्षता घेतली.

संक्षिप्त धावफलक

पंजाब, पहिला डाव: (कालच्या 7 बाद 342 वरून) 117.2 षटकांत सर्वबाद 432 (ईश राव 43, क्रिश भगत 50, फरदीन खान 18-3-70-0, पुंडलिक नाईक 7-2-22-0, यश कसवणकर 32-5-110-1, दीप कसवणकर 39.2-4-161-7, शिवांक देसाई 17-0-55-2, देवनकुमार चित्तेम 4-0-13-0).

गोवा, पहिला डाव: 60.1 षटकांत 9 बाद 177 (देवनकुमार चित्तेम 70, आर्यन नार्वेकर 0, इझान शेख 20, सनथ नेवगी 19, दीप कसवणकर 14, यश कसवणकर 15, वर्धन मिस्कीन 29, रिजुल पाठक 4, फरदीन खान 2, शिवांक देसाई नाबाद 0, क्रिश भगत 1-41, रमणदीप सिंग 3-30, इमानज्योत चहल 1-42, आराध्य शुक्ला 1-33, आर्यन यादव 2-28, उदय सहारन 1-1).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

SCROLL FOR NEXT