T-20 World Cup: झिम्बाब्वेला नमवून भारत गटात अव्वल

71 धावांनी मात; आता सेमीफायनलमध्ये इंग्लंडशी लढत
T-20 World Cup India Beats Zimbabwe
T-20 World Cup India Beats ZimbabweDainik Gomantak
Published on
Updated on

T-20 World Cup: टी-20 क्रिकेट वर्ल्डकपच्या सुपर-12 फेरीतील अखेरच्या लढतीत भारताने झिम्बाब्वेवर 71 धावांनी विजय मिळवला. भारताने झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 187 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र झिम्बाब्वेचा डाव 115 धावात आटोपला. (India Beats Zimbabwe)

T-20 World Cup India Beats Zimbabwe
T20 WC: हुश्श! पोहचलो एकदाचे सेमी फायनलमध्ये; अखेर पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र

या विजयाने ग्रुप-2 च्या क्रमवारीत भारताने अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. यापुर्वी पाकिस्तानने बांगलादेशला हरवून 6 गुण घेत अव्वल स्थान पटकावले होते. आता स्पर्धेतील उपांत्य फेरीतील लढतीत भारताचा सामना इंल्गंडशी होणार आहे.

187 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या झिम्बाब्वेच्या विजली मॅधवरेला भुवनेश्वर कुमारने पहिल्याच चेंडूवर शुन्यावर बाद केले. तर अर्शदीप सिंगने देखील रेगिस चकाब्ववाला शुन्यावर बाद करत झिम्बाब्वेला दुसरा धक्का दिला. त्यानंतर हार्दिक पांड्या आणि मोहम्मद शमीने देखील आपले विकेटचे खाते उघडले. पांड्याने क्रेग एर्विन (13) तर शमीने सेन विलियम्सला (11) बाद केले.

यानंतर शमीने टोनी मोन्योंगाला 5 धावांवर बाद करत झिम्बाब्वेची अवस्था 5 बाद 36 धावा अशी केली. त्यानंतर अश्विनने झिम्बाब्वेला तीन धक्के दिले. त्याने 22 चेंडूत 35 धावा करणाऱ्या रेयान बर्लला 14 व्या षटकात बाद केले. त्यानंतर 16 व्या षटकात मसाकाद्झा आणि नगारावाला प्रत्येकी 1 धावेवर बाद करत झिम्बाब्वेची अवस्था 8 बाद 106 धावा अशी केली.

T-20 World Cup India Beats Zimbabwe
T20WC: भारत इन, आफ्रिका आऊट! नेदरलँडचा दक्षिण आफ्रिकेला चकवा

तत्पुर्वी रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने या सामन्यात दिनेश कार्तिकच्या जागी ऋषभ पंतला संधी दिली. प्रथम फलंदाजी करताना भारताकडून सूर्यकुमार यादवने धडाकेबाज केली. सूर्यकुमारने 25 चेंडूत 61 धावा केल्या. भारताचा कर्णधार रोहित शर्माला झिम्बाब्वेविरूद्धच्या सामन्यात देखील मोठी खेळी करण्यात अपयश आले. त्याला मुजारबानीने 15 धावांवर बाद केले. सेट झालेले फलंदाज केएल राहुल आणि विराट कोहली हे मोठे फटके मारण्याच्या नादात बाद झाले.

राहुल अर्धशतकानंतर लगेचेच परतला. पंत मोठा फटका मारण्याच्या आऊट झाला. भारताने पाठोपाठ तीन विकेट गमावल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांनी दमदार फलंदाजी करत भारताला 18 व्या षटकात 150 धावांचा टप्पा पार करून दिला. पांड्या 18 चेंडूत 18 धावा करून बाद झाला. भारताने 20 षटकात 5 बाद 186 धावा केल्या. दरम्यान, सूर्यकुमार यादवने यंदाच्या वर्षात टी 20 क्रिकेटमध्ये 1000 धावांचा टप्पा पार केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com