Punjab won against Goa in National Sub Junior Hockey Tournament Dainik Gomantak
क्रीडा

राष्ट्रीय सबज्युनियर हॉकी स्पर्धेत पंजाब संघाची गोव्यावर मात

National Sub Junior Hockey Tournament : बंगाल, चंडीगड, मध्य प्रदेशची विजयी कूच

किशोर पेटकर

पणजी : यजमान गोवा 12व्या राष्ट्रीय सबज्युनियर हॉकी स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यात अपराजित राहिला, मात्र फ गटात त्यांना मंगळवारी बलाढ्य पंजाबकडून 12-0 फरकाने मोठा पराभव पत्करावा लागला. यासह पंजाबने विजयी आगेकूच राखली, तर गोव्याला उपांत्यपूर्व फेरी गाठणे कठीण ठरले. (Punjab won against Goa in National Sub Junior Hockey Tournament)

पेडे-म्हापसा येथील अॅस्ट्रो टर्फ हॉकी मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत बंगाल, चंडीगड, मध्य प्रदेश संघाने विजयी कामगिरी बजावली. क गटात बंगालने तमिळनाडूस 4-1 असे, चंडीगडने ह गटात आसामला 11-2 असे, तर मध्य प्रदेशने महाराष्ट्राला 8-0 असे सहजपणे हरविले.

गोव्याविरुद्ध पंजाबच्या एकतर्फी विजयात लव्हनूर सिंग व प्रभज्योत सिंग यांनी हॅटट्रिक नोंदविली. प्रभदीप सिंगने दोन, तर प्रीतपाल सिंग, हरप्रीत सिंग, जपनित सिंग व रोहन भूषण यांनी प्रत्येकी एक गोल केला. गोव्याने अगोदरच्या लढतीत दिल्लीला 1-1 असे गोलबरोबरीत रोखले होते, तर पुदुचेरीवर 6-0 फरकाने मात केली होती.

बंगालच्या विजयात करण शॉ याने दोन, अमनकुमार ठाकूर, आयुष प्रसाद यांनी प्रत्येकी एक गोल केला. तमिळनाडूचा एकमात्र गोल ए. प्रवीण याने नोंदविला. आसामविरुद्ध चंडीगडसाठी गुरप्रीत सिंग व कर्णधार गुरजीत सिंग यांनी प्रत्येकी तीन, तर कोमलप्रीत सिंग, करणज्योत सिंग, राजवीर सिंग, फतेह सिंग व पंकज शर्मा यांनी प्रत्येकी एक गोल केला. आसामतर्फे धनंजॉय मंडल व मानसरिज बोरो यांनी प्रत्येकी एक गोल केला. महाराष्ट्राविरुद्ध मध्य प्रदेशसाठी कर्णधार राजाभैया कोरी याने तीन करण गौतमने दोन, सिद्धार्थ बेन, रितेंद्रप्रताप सिंग व आझाद सुल्तान यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

SCROLL FOR NEXT