punjab kings vs royal challengers bangalore ipl 2022 live pbks vs rcb cricket match score live updates  Dainik Gomantak
क्रीडा

पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय

दोन्ही संघांची कमान नव्या खेळाडूंच्या हाती

दैनिक गोमन्तक

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मधील पहिला डबल हेडर आज म्हणजेच 27 मार्च रोजी आहे. दुसरा सामना पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात संध्याकाळी साडेसातपासून मुंबईच्या डॉ.डी.वाय.पाटील स्टेडियमवर खेळवला जात आहे. पंजाब किंग्जचा कर्णधार मयंक अग्रवालने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही संघांची कमान नव्या खेळाडूंच्या हाती आहे. प्रीती झिंटाच्या सह-मालक असलेल्या पंजाब (Punjab) किंग्जची धुरा मयंक अग्रवालच्या हातात आहे. त्याचबरोबर विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने संघाची कमान दक्षिण आफ्रिकेचा महान खेळाडू फाफ डू प्लेसिसकडे सोपवली आहे.

पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Bangalore) यांच्यात आतापर्यंत 28 सामने झाले आहेत. यातील 13 सामने जिंकण्यात आरसीबीला यश आले आहे. पंजाब किंग्जने 15 सामन्यांमध्ये आपली धुरा वाहिली आहे. मात्र, आतापर्यंत या दोघांमध्ये भारतात 22 सामने खेळले गेले आहेत. या दोन्ही संघांना 11-11 सामने जिंकण्यात यश आले आहे. डीवाय पाटील स्टेडियमवर दोघे पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Betim: सफर गोव्याची! डोंगर आणि नदी यांच्यामधील दुवा; निसर्गसंपन्न 'बेती'

पाकिस्ताननं 'B' टीमला हरवलं, पण जल्लोष वर्ल्ड कप जिंकल्यासारखा! शाहबाज शरीफ यांच्या 'प्राइड'वर आकाश चोप्राचा 'मास्टर स्ट्रोक'

VIDEO: पाकिस्तानी अंपायरचा तो 'अजब' निर्णय! ऑस्ट्रेलियन खेळाडूही चक्रावले, नेटकरी म्हणाले, "अशा अडाणी लोकांना अंपायर कोणी केलं?"

Video: "हटो हटो, डोन्ट डिस्टर्ब चेट्टा"! कॅप्टन सूर्याचा धमाल व्हिडीओ; नेटवर घालतोय धुमाकूळ

Goa Police Attack: दगडफेक अन् शस्त्राने वार! मध्य प्रदेशात गोवा पोलिसांवर जीवघेणा हल्ला; सब-इन्स्पेक्टर अन् हवालदार जखमी

SCROLL FOR NEXT