DC vs MI IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा 4 गडी राखून केला पराभव

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा हा 130 वा सामना
cricket dc vs mi ipl 2022 match live updates delhi vs mumbai match live score commentary live blog
cricket dc vs mi ipl 2022 match live updates delhi vs mumbai match live score commentary live blog Dainik Gomantak
Published on
Updated on

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 15 व्या हंगामातील दुसरा सामना रविवारी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. एकेकाळी मुंबई इंडियन्स हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, मात्र अक्षर पटेल आणि ललित यादव यांनी सामन्याचे फासे फिरवले. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) 4 गडी राखून पराभव केला.

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 177 धावा केल्या. मुंबईकडून इशान किशनने 81 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने 41 धावा केल्या. अशाप्रकारे दिल्लीसमोर विजयासाठी 178 धावांचे लक्ष्य होते, जे दिल्ली संघाने 18.2 षटकांत 6 गडी गमावून पूर्ण केले. अक्षर पटेल 17 चेंडूत 38 आणि ललित यादवने 38 चेंडूत 48 धावा करून नाबाद राहिला.

cricket dc vs mi ipl 2022 match live updates delhi vs mumbai match live score commentary live blog
Swiss Open 2022 : पीव्ही सिंधूने अंतिम फेरीत पटकावले विजेतेपद

रोहितने त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला 5 वेळा (2013, 2015, 2017, 2019 आणि 2020) चॅम्पियन बनवले आहे. डेक्कन चार्जर्सचा खेळाडू म्हणून तो 2009 मध्ये आयपीएल चॅम्पियन होता. दिल्ली कॅपिटल्सने एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावलेले नाही. आयपीएल 2021 मध्ये तो फायनल खेळला होता, पण त्यानंतर त्याला मुंबईविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सची कमान श्रेयस अय्यरच्या हाती होती.

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा हा 130 वा सामना आहे. यापूर्वी 129 सामन्यांपैकी 75 सामन्यात संघाने विजय मिळवला होता, तर 50 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. चार सामने बरोबरीत होते. ऋषभ पंतने आतापर्यंत १६ सामन्यांत दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले आहे. यामध्ये संघाने 9 वेळा विजय मिळवला, तर 6 वेळा पराभवाला सामोरे जावे लागले. एक सामना बरोबरीत सुटला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com