Prabhsimran Singh
Prabhsimran Singh Dainik Gomantak
क्रीडा

Prabhsimran Singh Century: प्रभसिमरनचे दिल्लीविरुद्ध 'विक्रमी' शतक! पंत-जयस्वालसारख्या खेळाडूंच्या यादीत मिळवलं स्थान

Pranali Kodre

Prabhsimran Singh Century: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत शनिवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात अरुण जेटली स्टेडियमवर सामना झाला. या सामन्यात पंजाब किंग्सचा युवा सलामीवीर प्रभसिमरन सिंगने शतकी खेळी केली.

या सामन्यात प्रभसिमरनने समोरून संघसहकाऱ्यांच्या विकेट्स जात असतानाही एका बाजूने भक्कमपणे उभे राहात हे शतक केले. त्याने 61 चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले.

हे त्याचे आयपीएल कारकिर्दीतील पहिले शतक ठरले आहे. पण तो शतक केल्यानंतर लगेचच बाद झाला. त्याला मुकेश कुमारने त्रिफळाचीत केले. दरम्यान, त्याच्या शतकाच्या जोरावर पंजाबने 20 षटकात 7 बाद 167 धावा केल्या.

प्रभसिमरनने 65 चेंडूत 10 चौकार आणि 6 षटकारांसह 103 धावांची खेळी केली. त्यामुळे तो आयपीएलमध्ये शतक करणारा सातवा अनकॅप खेळाडू (आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेले) ठरला आहे.

यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यापूर्वी आयपीएलमध्ये शतक करणाऱ्या खेळाडूंमध्ये शॉन मार्श, मनिष पांडे, पॉल वॉल्थटी, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार आणि यशस्वी जयस्वाल या खेळाडूंचा समावेश आहे.

आयपीएलमध्ये शतक करणारे अनकॅप खेळाडू

  1. शॉन मार्श - विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 2008

  2. मनिष पांडे - विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 2009

  3. पॉल वॉल्थटी - विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, 2011

  4. देवदत्त पडिक्कल - विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 2021

  5. रजत पाटिदार - विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स, 2022

  6. यशस्वी जयस्वाल - विरुद्ध मुंबई इंडियन्स, 2023

  7. प्रभसिमरन सिंग - विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 2023

शतक करणारा युवा खेळाडू

प्रभसिमरन याने हे शतक केले, तेव्हा त्याचे वय 22 वर्षे 276 दिवस इतके आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात पहिले शतक करणाऱ्या खेळाडूंमध्ये प्रभसिमरन सहाव्या क्रमांकावर आहे.

सर्वात कमी वयात आयपीएल शतक करणारे खेळाडू

  • 19 वर्षे, 253 दिवस - मनिष पांडे (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर वि. डेक्कन चार्जर्स, 2009)

  • 20 वर्षे, 218 दिवस - ऋषभ पंत (दिल्ली कॅपिटल्स वि. सनरायझर्स हैदराबाद, 2018)

  • 20 वर्षे, 289 दिवस - देवदत्त पडिक्कल (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर वि. राजस्थान रॉयल्स, 2021)

  • 21 वर्षे, 123 दिवस - यशस्वी जयस्वाल (राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स, 2023)

  • 22 वर्षे, 151 दिवस - संजू सॅमसन (दिल्ली कॅपिटल्स वि. रायझिंग पुणे सुपर जायंट्स, 2017)

  • 22 वर्षे, 276 दिवस - प्रभसिमरन सिंग (पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, 2023)

आयपीएल 2023 मधील भारतीय खेळाडूचे चौथे शतक

प्रभसिमरन आयपीएल 2023 मध्ये शतक करणारा चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्यापूर्वी वेंकटेश अय्यर, यशस्वी जयस्वाल आणि सुर्यकुमार यादव या भारतीय फलंदाजांनी या हंगामात शतक केले आहे. त्यामुळे एकाच हंगामात चार भारतीय फलंदाजांनी शतक करण्याची ही केवळ दुसरीच वेळ ठरली आहे.

यापूर्वी 2019 साली झालेल्या आयपीएलमध्ये संजू सॅमसन, केएल राहुल, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या चार भारतीय फलंदाजांनी शतके केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT