गोव्यात सरकारी मालमत्तेवर चोरट्यांचा डल्ला! पणजीमधून पंचायत संचालनालयाच्या दोन गाड्या चोरीला; पोलीस तपास सुरु

Panaji Government Car Theft: पणजीमधून एक खळबळजनक घटना समोर आली. चक्क पंचायत संचालनालयाच्या मालकीची दोन सरकारी चारचाकी वाहने चोरीला गेली.
Bicholim Theft
Bicholim TheftDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पणजीमधून एक खळबळजनक घटना समोर आली. पंचायत संचालनालयाच्या मालकीची दोन सरकारी चारचाकी वाहने चोरीला गेली. करंझाळे भागातून ही वाहने चोरीला गेली असून या घटनेमुळे सरकारी मालमत्तेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याप्रकरणी पणजी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पार्क केलेली वाहने गायब

मिळालेल्या माहितीनुसार, चोरीला गेलेली ही दोन्ही वाहने पंचायत संचालनालयाच्या स्वच्छता मोहिमेसाठी वापरली जात होती. मोहीम पूर्ण झाल्यानंतर ही वाहने पणजीतील कामराभाट परिसरातील इंटरनॅशनल हॉटेलजवळ उभी करण्यात आली होती. बराच काळ ही वाहने एकाच ठिकाणी होती. 2 सप्टेंबर रोजी जेव्हा संबंधित विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले, तेव्हा त्यांना दोन्ही वाहने गायब असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी तातडीने या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.

Bicholim Theft
Panaji Vehicle Theft Case: गुन्हेगारी इतिहास नाही, मग कोठडी कशाला? वाहन चोरी प्रकरणात वकिलांचा जोरदार युक्तिवाद; 19 वर्षीय जेडन-गौरक्षला सशर्त जामीन

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा शोध सुरु

पंचायत संचालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर पणजी (Panaji) पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये एफआयआर (FIR) नोंदवला. ही वाहने नेमकी कधी आणि कोणी पळवली, याचा शोध घेण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत आहेत. वाहने अनेक दिवस एकाच जागी उभी असल्याने चोरट्यांनी त्याचा फायदा घेतला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

Bicholim Theft
Panaji: पार्किंगमधील सरकारी वाहनात आढळला मृतदेह, पणजीतील घटनेने खळबळ; ‘संशयास्पद मृत्यू’ म्हणून गुन्हा नोंद

सरकारी यंत्रणेत खळबळ

पणजीतील गजबजलेल्या भागातून दोन-दोन सरकारी वाहने चोरीला गेल्यामुळे पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. पोलिसांनी या वाहनांचे क्रमांक आणि वर्णनानुसार गोव्यातील सर्व चेकपोस्टना सतर्क केले आहे. "आम्ही सर्व बाजूंनी तपास करत आहोत आणि लवकरच या वाहनांचा शोध लावला जाईल," असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com