IPL 2023 च्या 57 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा पराभव केला. आज गुजरात संघाच्या पराभवानंतर प्लेऑफच्या तिकिटाची प्रतीक्षा वाढली आहे.
दुसरीकडे, मुंबई इंडियन्सने आपल्या 7 व्या विजयासह प्लेऑफची लढत रंजक बनवली आहे. मागील सामन्यात गुजरातने मुंबईचा 55 धावांनी पराभव केला होता.
तर या सामन्यात मुंबईने 27 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, 219 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सची सुरुवात खराब झाली. पॉवरप्लेमध्येच संघाने तीन गडी गमावले. साहा (2), शुभमन गिल (6) आणि कर्णधार हार्दिक पांड्या 4 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतले. विजय शंकरने 14 चेंडूत 29 धावा केल्या.
त्याने तूफानी 6 चौकार मारले. तर अभिनव मनोहरला केवळ दोन धावा करता आल्या. यानंतर, डेव्हिड मिलरने दमदार फलंदाजी करत 26 चेंडूत 41 धावा काढल्या.
आपल्या खेळीत त्याने दोन षटकार आणि चार चौकार लगावले. दरम्यान, राशिद खानने वेगवान फलंदाजी करत 21 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
दुसरीकडे, पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) सूर्यकुमारच्या दमदार शतकी खेळीमुळे 20 षटकांत 5 गडी गमावून 218 धावा केल्या. मुंबईकडून सूर्यकुमारने 103 धावा केल्या. तर गुजरात टायटन्सकडून राशिद खानने 4 बळी घेतले.
तसेच, रोहित शर्मा आणि ईशान किशन (Ishan Kishan) यांनी संघाला दमदार सुरुवात करुन दिली. पॉवरप्लेमध्ये संघाने एकही विकेट गमावली नाही. 6 षटकांत 61 धावा काढल्या.
मात्र, राशिद खानने दोन्ही सलामीवीरांना 7व्या षटकात पॅव्हेलियनमध्ये पाठवले. रोहित 29 तर ईशान 31 धावा करुन बाद झाला. निहाल वढेराला 7 चेंडूत 15 धावा करता आल्या.
त्याचबरोबर, विनोदाने 20 चेंडूत 30 धावा केल्या. त्याने सूर्यासोबत शानदार अर्धशतकी भागीदारीही केली. दरम्यान, सूर्याने 32 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
यानंतर त्याने डावाच्या शेवटच्या चेंडूवर आपले शतकही पूर्ण केले. सूर्याने शेवटच्या षटकात दोन षटकार मारत शतक पूर्ण केले. सूर्या 49 चेंडूत 103 धावा केल्यानंतर नाबाद राहिला. आपल्या खेळीत त्याने 11 चौकार आणि 6 षटकार मारले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.