PSL Viral Video Dainik Gomantak
क्रीडा

VIDEO: काय ती क्वालिटी अन् काय तो दर्जा! 'PSL'मध्ये पांढऱ्या चेंडूचा झाला 'गुलाबी' चेंडू, पाकड्यांची पुन्हा लाज गेली

PSL Viral Video: क्रिकेटच्या मैदानात अनेकदा अतरंगी घटना घडत असतात, पण पाकिस्तान सुपर लीग (PSL) मध्ये नुकत्याच घडलेल्या एका प्रकाराने क्रीडा विश्वात हशा पिकवला आहे.

Sameer Amunekar

क्रिकेटच्या मैदानात अनेकदा अतरंगी घटना घडत असतात, पण पाकिस्तान सुपर लीग (PSL) मध्ये नुकत्याच घडलेल्या एका प्रकाराने क्रीडा विश्वात हशा पिकवला आहे. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात चेंडूचा रंग अचानक बदलल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. पांढरा शुभ्र चेंडू अचानक गुलाबी झाल्याने खेळाडू गोंधळले, मात्र यामागचे कारण समोर आल्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) नियोजनावर आणि साहित्याच्या दर्जावर सडकून टीका होत आहे.

जर्सीचा रंग लागला चेंडूला

२६ मार्च रोजी लाहोर कलंदर्स आणि हैदराबाद किंग्समेन यांच्यात हा सामना रंगला होता. हैदराबादचा संघ गोलंदाजी करत असताना ही अजब घटना घडली. हैदराबादच्या खेळाडूंनी घातलेल्या जर्सीचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे यावेळी उघड झाले.

क्षेत्ररक्षण करताना खेळाडूंच्या हाताचा किंवा जर्सीचा स्पर्श वारंवार चेंडूला लागत होता. जर्सीचा रंग इतका कच्चा होता की, तो चेंडूवर उतरू लागला. पाहता पाहता पांढरा चेंडू गुलाबी रंगाचा झाला. फलंदाजांच्या हे लक्षात येताच त्यांनी अंपायरकडे धाव घेतली आणि तक्रार केली. अखेर अंपायरला तो चेंडू बदलावा लागला.

सोशल मीडियावर पीएसएलची उडाली खिल्ली

या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी पाकिस्तान क्रिकेटची फिरकी घेण्यास सुरुवात केली आहे. "जगातील सर्वोत्तम लीग असल्याचा दावा करणाऱ्या पीएसएलमध्ये खेळाडूंना साध्या चांगल्या दर्जाच्या जर्सीही मिळत नाहीत का?" असा सवाल चाहते विचारत आहेत. अनेक क्रिकेट प्रेमींनी याला 'कलर बदलणारा चेंडू' म्हणत उपरोधिक टोले लगावले आहेत. या प्रकारामुळे पाकिस्तानच्या क्रीडा साहित्याच्या गुणवत्तेचे धिंडवडे निघाले आहेत.

सामन्याचा निकाल: लाहोरचा मोठा विजय

मैदानावरील या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर खेळाचा विचार केला तर लाहोर कलंदर्सने एकतर्फी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना लाहोरने २० षटकांत ६ गड्यांच्या बदल्यात १९९ धावांचा डोंगर उभा केला. सलामीवीर फखर जमानने ५३ धावांची धडाकेबाज खेळी केली, तर मोहम्मद नईम आणि हसिबुल्लाह खान यांनी मोलाची साथ दिली. सिकंदर रझाने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत धावसंख्या २०० च्या जवळ नेली.

प्रत्युत्तरादाखल खेळताना हैदराबाद किंग्समेनचा संघ पूर्णपणे ढेपाळला. कर्णधार मार्नस लॅबुशेनने सर्वाधिक २६ धावा केल्या, मात्र इतर फलंदाजांनी नांगी टाकली. हैदराबादचा संपूर्ण संघ अवघ्या १३० धावांत गारद झाला आणि लाहोर कलंदर्सने ६९ धावांनी हा सामना खिशात घातला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Theatre Day: '..ही नाट्यवेडा म्हणवून घेणाऱ्या गोमंतकासाठी नामुष्कीची गोष्ट नव्हे का'?जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने

Fight Video Viral: रणवीर सिंगचा स्वॅग पडला भारी! 'धुरंधर 2' मुळे चित्रपटगृहात तुफान राडा, प्रेक्षक आपसात भिडले; व्हिडिओ व्हायरल

Socorro: सफर गोव्याची! डोंगराच्या पायथ्याला वसलेले, शेतीसंपन्न 'सुकूर'

कातोर - फातोराची निर्मिती त्याकाळी 'देवमाश्या'च्या शेपटीच्या तडाख्याने झाल्याची लोकश्रद्धा आहे; सांग्यातल्या अश्मयुगीन काळातील खुणा

Together For Mapusa: म्हापशाच्या विकासासाठी ‘टुगेदर फॉर म्हापसा’! विविध क्षेत्रांतील लोक एकत्र; ‘शॅडो कौन्सिल’च्या तत्त्वावर चालणार काम

SCROLL FOR NEXT