Prithvi Shaw Controversy Dainik Gomantak
क्रीडा

Prithvi Shaw नं केला देवाचा धावा, महिलेला मारहाणीच्या आरोपानंतर पोस्ट होतेय व्हायरल

Pranali Kodre

Prithvi Shaw Attacked By Fans: भारतीय संघाचा सलामीवीर पृथ्वी शॉ नव्या वादात अडकला आहे. गुरुवारी त्याचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यामध्ये त्याच्यावर एका मुलीला मारहाण करण्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर त्याने सोशल मीडियावर टाकलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

झाले असे की गुरुवारी जे व्हिडिओ समोर आले होते, त्यामध्ये पृथ्वी शॉ एका मुलीबरोबर झटापट करताना दिसत आहे. ही मुलगी सोशल मीडिया इन्फ्ल्युएसंर सपना गिल असल्याचे समोर आले आहे. तसेच या व्हिडिओमध्ये तिच्याबरोबर असलेला एक व्यक्ती शॉविरुद्धचा पुरावा असल्याचा दावा करत आहे.

गुरुवारी समोर आलेल्या या प्रकरणादरम्यानच शॉ याने इंस्टाग्राम स्टोरीवर साईबाबा यांचा एक फोटो शेअर केला असून त्यावर ओम साई राम असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे अनेक युजर्सने त्याच्यावरील आरोपानंतर आता त्याने देवाचा धावा केला असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. याचमुळे त्याची ही पोस्ट चर्चेतही आली आहे.

Prithvi Shaw Instagram Story

दरम्यान, शॉ हा साईबाबा यांचा भक्त असल्याचे अनेकांना माहत आहे. त्याने यापूर्वीही अनेकदा साईबाबांचे दर्शन घेतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. तसेच त्याने यापूर्वीही भारतीय संघात स्थान न मिळाल्यानंतर साईबाबा यांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

सेल्फी देण्यास दिला होता नकार

अनेक रिपोर्ट्सनुसार शॉ त्याचा मित्र आशिष सुरेंद्र यादव 15 फेब्रुवारी रोजी सांताक्रुझमधील एका रेस्टॉरंटमध्ये गेला होता.यादरम्यान काही जणांनी त्याच्याकडे सेल्फीची मागणी केली होती. त्याने काही सेल्फी दिल्यानंतर काही लोक पुन्हा त्याच्याजवळ आले. त्यानंतर त्याने सेल्फीसाठी नकार दिला. याचवरून या वादाच्या प्रकरणाला सुरुवात झाल्याचे समजत आहे.

तसेच मिळालेल्या माहितीनुसार शॉने हॉटेल मॅनेजरकडे तक्रारही केली होती, ज्यानंतक मॅनेजरने त्या ग्रुपला शॉला डिस्टर्ब न करण्यास सांगितले. मात्र रेस्टॉरंटमधून बाहेर पडल्यानंतर सेल्फी मागणाऱ्या लोकांनी त्याला रोखले आणि त्यांनी कारवर हल्ला केला. ही कार आशिषची असल्याचे समजले आहे.

आशिषने केलेल्या आरोपांनुसार त्या लोकांनी त्यांच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केली, तसेच त्यांच्याविरुद्ध खोटा आरोप करण्याची धमकी दिली होती. या प्रकरणात ओशिवारा पोलिसांनी विविध कलमांअंतर्गत ८ जणांवर गुन्हा दाखल केला असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, असेही समोर आले आहे की सपना गिलचे वकील अली काशिफ खान यांनी शॉने सपनाला मारहाण केल्याचा आरोप केला आहे. पण अद्याप या प्रकरणाबद्दल संपूर्ण सत्य समोर आलेले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

विजयनगर साम्राज्य, गोव्याचा संदर्भ; मदुराई आणि कुमार कंपण्णांचा इतिहास याबद्दल जाणून घ्या

Top Most Polluted Countries: जगातील 'हे' 8 देश सर्वाधिक प्रदूषित; क्रमवारीत भारत तिसऱ्या क्रमांकावर!

Goa Politics: दिल्लीत नेमके 'काय' घडले? 'कुणाला' समज, 'कुणाला' आदेश..

Anti Aircraft Missile System: कोणत्या देशांकडे आहे बेस्ट एण्टी एअरक्राफ्ट मिसाईल सिस्टीम; भारताचं काय स्टेटस?

Bhandari Community In Goa: निवडणुकीची घोषणा होणार? भंडारी समाजाच्या आमसभेकडे सगळ्यांचे लक्ष

SCROLL FOR NEXT