Prithvi Shaw DainikGomantak
क्रीडा

Prithvi Shaw: 'त्या' एका वर्षाच्या ब्रेकनं बदललं आयुष्य; दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात पुनरागमन अन् शॉचा मोठा खुलासा

Prithvi Shaw IPL 2026 Comeback: भारतीय क्रिकेट वर्तुळातील एकेकाळचा 'वंडर बॉय' मानला जाणारा पृथ्वी शॉ पुन्हा एकदा आयपीएलच्या मैदानात शड्डू ठोकण्यासाठी सज्ज झाला.

Manish Jadhav

Prithvi Shaw Career Turning Point: भारतीय क्रिकेट वर्तुळातील एकेकाळचा 'वंडर बॉय' मानला जाणारा पृथ्वी शॉ पुन्हा एकदा आयपीएलच्या मैदानात शड्डू ठोकण्यासाठी सज्ज झाला. आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिल्यानंतर पृथ्वीच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, 2026 च्या मिनी ऑक्शनमध्ये दिल्ली कॅपिटल्सने पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास दाखवत 75 लाखांच्या बेस प्राईसमध्ये त्याला आपल्या संघात सामील करुन घेतले. या पुनरागमनानंतर शॉने आपल्या क्रिकेटिंग करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील संघर्षावर प्रथमच मोकळेपणाने भाष्य केले असून हा एक वर्षाचा ब्रेक त्याच्यासाठी 'टर्निंग पॉईंट' ठरल्याचे त्याने म्हटले.

2023 आणि 2024 च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) पृथ्वीला अनेक संधी दिल्या, परंतु त्याच्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या. दोन हंगामांतील 16 डावांत त्याला केवळ 304 धावा करता आल्या. खराब फॉर्म आणि मैदानाबाहेरील वादविवाद यांमुळे त्याला 2024 च्या हंगामाच्या मध्यात दिल्लीने संघातून बाहेर केले. इतकेच नाही तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईच्या संघातूनही त्याला डच्चू देण्यात आला. या पडत्या काळात त्याने क्रिकेटपासून घेतलेला ब्रेक त्याच्यासाठी मानसिकदृष्ट्या फायदेशीर ठरला.

"मी माझ्या आयुष्याचा आनंद घेतला, मन ताजेतवाने करण्यासाठी प्रवास केला आणि पुन्हा एकदा जुन्या रुटीनमध्ये परतलो. आता मी पूर्वीपेक्षा तिप्पट मेहनत करतोय," असे पृथ्वीने आयपीएल 2026 सुरु होण्यापूर्वी दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

स्वतःच्या चुकांबद्दल बोलताना पृथ्वी कमालीचा परिपक्व वाटला. श्रेयस अय्यरने त्याच्या कामाच्या पद्धतीवर केलेल्या टीकेचा संदर्भ देत त्याने मान्य केले की, एक माणूस म्हणून त्याच्याकडून चुका झाल्या. तो म्हणाला, "बाहेर जे बोलले किंवा लिहिले जाते, ते केवळ अर्धे सत्य असते. माझे कुटुंब आणि मित्र मला ओळखतात. सोशल मीडिया किंवा वर्तमानपत्रात माझ्याबद्दल जे काही छापून यायचे, तेव्हा ते समजून घेण्यासाठी मी खूप लहान होतो. पण आता मी प्रत्येक गोष्ट गांभीर्याने समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे." मुंबई संघातून बाहेर पडल्यानंतर तो महाराष्ट्रासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळू लागला आणि तिथे त्याने आपल्या खेळात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला.

आयपीएल (IPL) 2026 मध्ये दिल्ली कॅपिटल्सची पहिली लढत 1 एप्रिल रोजी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध होणार आहे. या सामन्यात पृथ्वीला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. दिल्लीच्या संघात सलामीवीर म्हणून केएल राहुलची जागा पक्की मानली जात आहे. मात्र, राहुलचा जोडीदार कोण असेल, यावरुन संघ व्यवस्थापनासमोर मोठे पेचचिन्ह आहे. पृथ्वी शॉसमोर अभिषेक पोरेल आणि पथुम निसंका यांसारख्या खेळाडूंचे आव्हान आहे. 75 लाखांत खरेदी केलेला पृथ्वी जर आपल्या जुन्या 'विस्फोटक' अंदाजात परतला, तर दिल्लीसाठी ही एक मोठी जमेची बाजू ठरेल. या हंगामात पृथ्वी शॉ केवळ धावा करण्यासाठीच नाही, तर स्वतःला पुन्हा सिद्ध करण्यासाठी मैदानात उतरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

America New Visa Policy: ऑनलाईन फ्रॉड अन् सेक्सटॉर्शन करणाऱ्यांना झटका! अमेरिकन नागरिकांना लुटणाऱ्या चिनी गँगवर निशाण्यावर; ट्रम्प सरकारची नवी व्हिसा पॉलिसी जाहीर

Weather Update: राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम! IMD कडून 31 जुलैपर्यंत 'यलो अलर्ट'; मुसळधार सरींचा अंदाज

CJP Protest Violence: 'सीजेपी' आंदोलनातील हिंसेमागे पाकिस्तान कनेक्शन! दंगल घडवण्यासाठी भामट्यांनी वापरले 'ब्लूटूथ ॲप्स'; पोलिस तपासात हायटेक नेटवर्क उघड

Who is Samreen Kaur: टीम इंडियाचा मॅचविनर 'समरीन'च्या प्रेमात क्लिन बोल्ड! गर्लफ्रेंडसोबतचा रोमँटिक फोटो शेअर; पाहा कोण आहे ती?

CJP Protest: "शांततापूर्ण आंदोलन हा घटनात्मक अधिकार!" विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज पोलिसांना नडला; दडपशाही रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा मास्टरप्लॅन

SCROLL FOR NEXT