Prithvi Shaw Dainik Gomantak
क्रीडा

Prithvi Shaw: दुष्काळात तेरावा! इंग्लंडमध्ये पहिल्याच सामन्यात पृथ्वी शॉ 'हिट विकेट', पाहा Video

Pranali Kodre

Prithvi Shaw Hit-Wicket during Debut Match for Northamptonshire:

भारताचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉ गेल्या अनेक महिन्यांपासून राष्ट्रीय संघात पुनरागमानासाठी प्रयत्न करत आहे. आता तो इंग्लंडमध्ये गेला असून त्याने काउंटी क्लब नॉर्थहॅम्प्टनशायरबरोबर करार केला आहे.

त्यामुळे तो सध्या नॉर्थहॅम्प्टनशायरकडून रॉयल लंडन वनडे कप स्पर्धेत खेळत आहे. पण, तो नॉर्थहॅम्प्टनशायरकडून पदार्पणाच्या सामन्यातच विचित्र पद्धतीने बाद झाला आहे.

पृथ्वी शॉ याने शुक्रवारी (4 ऑगस्ट) ग्लॉस्टरशायरविरुद्ध पदार्पण केले. त्याने या सामन्यात सुरुवात चांगली केली होती. मात्र, त्याला त्या सुरुवातीचा फायदा घेता आला नाही आणि तो 35 चंडूत 2 चौकार आणि 1 षटकारासह 34 धावा करून विचित्र पद्धतीने हिट विकेट झाला. त्याच्या विकेटचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

पृथ्वी शॉची विकेट

या सामन्यात 279 धावांचे आव्हान ग्लॉस्टरशायरने नॉर्थहॅम्प्टनशायरसमोर आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना 30 धावातच नॉर्थहॅम्प्टनशायरने 5 विकेट्स गमावल्या.

पण सलामीला फलंदाजीसाठी उतरलेल्या पृथ्वी शॉने कर्णधार लेविस मॅकमॅनसबरोबर डाव पुढे नेत नॉर्थहॅम्प्टनशायरला 50 धावांचा टप्पा पार करून दिला होता. मात्र 16 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर तो बाद झाला.

या षटकात पॉल वॅन मिकेरेन गोलंदाजी करत होता. त्याने आखुड टप्प्यावर टाकलेल्या षटकातील अखेरच्या वेगवान चेंडूवर पृथ्वी शॉने फाईन लेगला मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे संतुलन बिघडले आणि तो खाली पडला, याचवेळी त्याची बॅट नकळत स्टंपला लागली आणि तो बाद झाला.

दरम्यान, शॉ बाद झाल्यानंतर लेविस आणि टॉम टेलर यांनी नॉर्थहॅम्प्टनशायरला स्थैर्य दिले. पण लेविस 54 धावांवर बाद झाला पण टेलरने नंतर जॅक व्हाईटला साथीला घेत शतकही झळकावले. त्याने 112 धावांची खेळी केली. तसेच व्हाईटने 29 धावा केल्या.

मात्र नॉर्थहॅम्प्टनशायरचा संघ 48.1 षटकात 255 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे ग्लॉस्टरशायरने हा सामना 23 धावांनी जिंकला.

ग्लॉस्टरशायरकडून टॉम प्राईस आणि अजीत सिंग डेल यांनी प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या. तसेच पॉल वॅन मिकेरेन आणि झाफर गोहर यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी, ग्लॉस्टरशायरकडून ग्रॅमी वॅन ब्युरनने 108 धावांची शतकी खेळी केली होती. तसेच अल्वर अलीने 61 धावांची खेळी केली होती. त्यामुळे ग्लॉस्टरशायरलने 48.4 षटकात सर्वबाद 278 धावा केल्या.

नॉर्थहॅम्प्टनशायरकडून बेन सँडरसनने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर रॉब केओघने 2 विकेट्स घेतल्या. तसेच टॉम टेलर आणि फ्रेडी हेल्ड्रीक यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Forward: नोकरभरतीसंदर्भात 'सात दिवसांत' योग्य निर्णय घ्या; गोवा फॉरवर्डची मागणी

Subhash Velingkar: आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वेलिंगकरांच्या अटकेसाठी गोवा पोलिसांची महाराष्ट्रात शोध मोहीम!

खरी कुजबुज: जीत - मायकल आमने सामने

Saint Francis Xavier पवित्र दर्शनात भ्रष्टाचार; प्रकल्पांमधले पैशे खिशात, जनतेचे पैसे बरबाद केल्याचा भाजप सरकारवर आरोप

Bicholim News: भाडेकरूंची डिचोली पोलिस स्थानकात गर्दी! कार्यक्षेत्रात तपासणी मोहिमेला वेग

SCROLL FOR NEXT