Umesh Yadav with Father Dainik Gomantak
क्रीडा

Umesh Yadav च्या वडिलांच्या निधनाबद्दल PM मोदींनी व्यक्त केला शोक, पत्रात लिहिलंय की...

उमेश यादवच्या वडिलांचे फेब्रुवारीच्या अखेरीस निधन झाले असून त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याला पत्र पाठवत दु:ख व्यक्त केले आहे.

Pranali Kodre

Umesh Yadav: भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव आणि त्याच्या कुटुंबावर फेब्रुवारीच्या अखेरीस दु:खाचा डोंगर कोसळला. उमेशला 22 फेब्रुवारी रोजी पितृशोक झाला होता. त्याचे वडील आजारी असल्याचे समजले होते. दरम्यान, वडिलांच्या निधनाचे दु:ख विसरून काही दिवसातच उमेश भारताकडून ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा कसोटी सामना देखील खेळला.

आता त्याच्या वडिलांच्या निधनाबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. याबद्दल त्यांनी उमेश यादवला शोक संदेश पत्र पाठवले आहेत. या पत्राबद्दल उमेश यादवने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.

उमेशने हे पत्र शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की 'माझ्या वडिलांच्या निधनाबद्दल तुमच्या शोक संदेशाबद्दल धन्यवाद. तुमचे हे पत्र माझ्यासाठी आणि माझ्या परिवारासाठी खूप महत्त्वाचे आहे.'

नरेंद्र मोदी यांनी पत्रामध्ये लिहिले आहे की 'श्री उमेश यादव जी तुमचे वडील श्री तिलक यादव यांच्या निधनाबद्दल ऐकून अत्यंत दु:ख झाले. या कठीण परिस्थित माझा संवेदना तुमच्या कुटुंबाबरोबर आहेत. वडिलांची सावली आणि त्यांचे प्रेम जीवनातील सर्वात मोठा आधार असतो. तिलक यादव यांनी त्यांच्या कुटुंबाप्रती विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत.

'क्रिकेटमधील तुझ्या आत्तापर्यंतच्या प्रवासात त्यांच्या त्यागाची आणि समर्पणाचे मोठे योगदान राहिले आहे. आपल्या जीवनात तुम्ही जे निर्णय घेतले, त्यावर त्यांनी पूर्ण विश्वास ठेवून तुमच्याबरोबर ते खंबीरपणे उभे राहिले.'

'तिलकजींच्या निधनानंतर तुमच्या आयुष्यात आलेल्या रिक्तपणाचे दु:ख शब्दात व्यक्त केले जाऊ शकत नाही. त्यांचे निधन हे तुमच्या कुटुंबासाठी भरुन न निघणारे नुकसान आहे. ते आज शरिराने या जगात नाही, पण त्यांच्या आठवणी आणि जीवनमुल्य कुटुंबाबरोबर कायम राहाणार आहेत. मी प्रार्थना करतो की या कठीण परिस्थितीचा सामना करण्याची तुमच्या कुटुंबाला शक्ती मिळो. ओम शांती.'

उमेशची भारतीय संघाकडून शानदार गोलंदाजी

सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सुरु असलेल्या कसोटी मालिकेसाठी उमेश यादवचा भारतीय संघात समावेश आहे. पण या मालिकेतील दुसरा सामना 19 फेब्रुवारीला संपला होता. त्यामुळे तो वडिलांच्या निधनानंतर घरी जाऊन आला होता. पण त्याला त्यानंतर तिसऱ्या सामन्यासाठी लगेचच भारतीय संघात परतावे लागले.

तिसऱ्या कसोटी सामन्यात उमेशला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधीही मिळाली. त्याने या सामन्याच्या पहिल्या डावात 3 महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. याबरोबर त्याने भारतात 100 कसोटी विकेट्सचा टप्पाही पार केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT