Poland Beats Saudi Arabia Dainik Gomantak
क्रीडा

Poland Beats Saudi Arabia: अर्जेंटिनाला हरविणाऱ्या सौदी अरेबियावर पोलंडची मात

2-0 गोलफरकाने विजय; रॉबर्ट लेवानडॉस्कीचा वर्ल्डकपमधील पहिला गोल

Akshay Nirmale

Poland Beats Saudi Arabia: फिफा वर्ल्डकपमध्ये सातव्या दिवशी ग्रुप सी मधील पोलंड विरूद्ध सौदी अरेबिया सामन्यात पोलंडने सहज विजय मिळवला. पोलंडने सौदीला 2-0 गोलफरकाने एकतर्फी मात दिली. सौदी अरेबियाला पुर्णवेळेत आणि भरपाई वेळेत देखील एकही गोल करता आला नाही.

(FIFA World Cup 2022)

फुटबॉल जगतातील एक स्टार स्ट्रायकर मानला जाणारा पोलंडचा कर्णधार रॉबर्ट लेवनडॉस्की याने पोलंडकडून गोलची नोंद केली. हा त्याचा वर्ल्डकपमधील पहिलाच गोल आहे. यापुर्वी त्याने पोलंडसाठी 76 गोल केले होते. पण वर्ल्डकपमध्ये त्याला एकही गोल करता आला नव्हता. या सामन्यात मात्र त्याचे स्वप्न पुर्ण झाले आहे. त्याने 82 व्या मिनिटाला गोल नोंदवत पोलंडची आघाडी 2-0 अशी केली.

उत्तरार्धातील खेळात सौदीने पोलंडला चांगली लढत दिली. पण पोलंडचा गोलकीपर सॅन्सी मुस्तैदी याने उत्तम कामगिरी पार पाडली. पुर्वाधात पोलंडच्या संघाने 1-0 अशी आघाडी घेतली होती. झिलिंन्सि याच्या गोलमुळे पोलंडला ही आघाडी मिळाली. कप्तान रॉबर्ट लेवनडॉस्कीच्या पासवर झिलिन्स्की याने 39 व्या मिनिटाला मैदानी गोल नोंदवला.

तथापि, पोलंडच्या बियालेकने सौदीच्या शियरी याला पेनल्टी एरियात पाडल्याने सौदीला पंचांनी पेनल्टी बहाल केली होती. पण त्याचा लाभ उठविण्यात सौदी अरेबियाचे खेळाडू अपयशी ठरले. सालेम अवलदवसारी याने ही संधी गमावली. या सामन्यात पोलंडच्या तीन खेळाडूंना यलो कार्ड दाखविण्यात आले. तर सौदीच्याही एका खेळाडूला यलो कार्ड दाखवले गेले. सौदीने यापुर्वीच्या सामन्यात बलाढ्य अर्जेंटिनाला पराभूत केले होते. तर पोलंडचा मेक्सिकोविरूद्धचा सामना अनिर्णित राहिला होता. पोलंडने हा सामना जिंकल्याने राऊंड ऑफ 16 मध्ये जायची उत्तम संधी त्यांच्याकडे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT