FIFA World Cup 2022: अर्जेंटिनावरील विजयाचे बक्षिस; सौदी अरेबियाच्या प्रत्येक खेळाडुला मिळणार 4 कोटींची कार
FIFA World Cup 2022: फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेत सौदी अरेबियाने अर्जेंटिनाला पराभवाचा धक्का दिला होता. या विजयानंतर सौदी अरेबियाच्या खेळाडुंवर बक्षिसांचा वर्षाव केला जात आहे. नुकतेच या विजयानंतर सौदीमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली होती आणि आता सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी या संघातील सर्व खेळाडुंना एक महागडी कार देण्याचा निर्णय घेतला आहे.
सौदी अरेबियाच्या संघातील खेळाडुंना महागडी आणि लक्झरीयस रॉल्स रॉयस फँटम (Rolls Royce Phantom) ही कार भेट म्हणून दिली जाणार आहे. या कारची किंमत 4 कोटी 25 लाख रूपये इतकी आहे. या लक्झरी कारमध्ये 48 वॉल्व्हचे V12 इंजिन आणि एक गॅसोलिन इंजेक्शन आहे. जे 460 HP (338 kW) पॉवरसह 720 न्यूटन-मीटर टॉर्क निर्माण करते. ही कार 5.7 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर स्पीड घेऊ शकते.
दरम्यान, सौदीच्या विजयानंतर संपुर्ण देशात एखाद्या सणासारखा माहौल होता. राजे सलमान यांनी बुधवारी सुट्टी घोषित केली होती. सरकारी, खासगी आणि सर्व क्षेत्रातील लोकांना ही सुट्टी देण्यात आली होती. सौदीच्या या विजयाने अर्जेंटिनाला इटलीचा सलग 37 सामन्यांमध्ये पराभूत न होण्याचा विक्रम मोडता आला नव्हता.
सौदीच्या अर्जेंटिनावरील 2-1 अशा विजयाने त्यांच्या गटात आता चुरस निर्माण झाली आहे. अर्जेंटिनावर सौदी अरेबियाचा हा ऐतिहासिक विजय आहे. या विजयाने सौदीकडे राऊंड ऑफ 16 मध्ये पोहचण्याची उत्तम संधी आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.