Australia Team Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर पॉइंट टेबलचे समीकरण बदलले, कांगारु संघाने घेतली झेप

World Cup 2023: विश्वचषक 2023 चा 14 वा सामना सोमवारी दिल्लीत श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला.

Manish Jadhav

World Cup 2023: विश्वचषक 2023 चा 14 वा सामना सोमवारी दिल्लीत श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांना चालू हंगामातील पहिला विजय हवा होता. इथे कांगारु संघ यशस्वी ठरला. त्यांनी श्रीलंकेविरुद्ध 88 चेंडू शिल्लक असताना पाच गडी राखून मोठा विजय मिळवला. सामन्यानंतर गुणतालिकेत काही बदल दिसत आहेत.

दरम्यान, पहिल्या विजयानंतर ऑस्ट्रेलिया (Australia) दोन (-0.734) गुणांसह आठव्या स्थानावर आला आहे. तर श्रीलंकेचा संघ नवव्या स्थानावर आहे. श्रीलंकेने सध्या सुरु असलेल्या स्पर्धेत तीन सामने खेळले आहेत. दरम्यान, त्याला प्रत्येक सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. श्रीलंकेचे शून्य (-1.532) गुण आहेत.

दुसरीकडे, विश्वचषक 2023 च्या 14 सामन्यांनंतर नेदरलँड संघ सर्वात खालच्या स्थानावर आहे. सध्या सुरु असलेल्या स्पर्धेत नेदरलँड्सने दोन सामने खेळले आहेत. दरम्यान, त्याला दोन्ही सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. नेदरलँड्स शून्य गुणांसह (-1.800) 10 व्या स्थानावर आहे.

यजमान भारतीय संघ पहिल्या स्थानावर आहे. भारताने तिन्ही सामने जिंकले आहेत. संघाचे एकूण सहा गुण (+1.821) आहेत. तर न्यूझीलंडचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचेही (New Zealand) सहा गुण (+1.604) आहेत.

गुणतालिकेत सर्व संघ पुढीलप्रमाणे आहेत.

भारत- 6 गुण (+1.821)

न्यूझीलंड- 6 गुण (+1.604)

दक्षिण आफ्रिका- 4 गुण (+2.360)

पाकिस्तान- 4 गुण (-0.137)

इंग्लंड- 2 गुण (-0.084)

अफगाणिस्तान- 2 गुण (-0.652)

बांगलादेश- 2 गुण (-0.699)

ऑस्ट्रेलिया- 2 गुण (-0.734)

श्रीलंका-(-1.532)

नेदरलँड्स-(-1.800)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अर्ध्या तासाच्या पावसानं मालपेतील रस्त्यांना ओहळाचे स्वरूप; वाहनचालकांचा खोळंबा; निचरा व्यवस्था नसल्याने समस्या

मुसळधार पावसाचा तडाखा! आके येथील गृहनिर्माण वसाहतीची संरक्षक भिंत कोसळली; परिसरात भीतीचं वातावरण

NSUI Law Students: 'कायदा'च्या विद्यार्थ्यांना न्याय द्या! 'एनएसयूआय'ची मागणी; कुलगुरूंकडून तोडगा काढण्याचे आश्‍वासन

Goa Tourist Safety: अभयारण्यातील धबधब्यांचे पर्यटकांना आकर्षण; नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल, दंडासह अटकेचीही शक्यता

California Shooting: कॅलिफोर्नियात फिफा वर्ल्ड कप फॅन झोनजवळ गोळीबार! एकाचा जागीच मृत्यू; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT