Australia vs Pakistan X/cricketcomau
क्रीडा

AUS vs PAK: ऐकावं ते नवलंच! अंपायरच अडकले लिफ्टमध्ये, सामनाही थांबला; वाचा नक्की झालं काय

Australia vs Pakistan, 2nd Test: ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान कसोटी सामना गुरुवारी काही वेळ अंपायर लिफ्टमध्ये अडकल्याने थांबला होता.

Pranali Kodre

Play delayed because third umpire Richard Illingworth stuck in the lift during Australia vs Pakistan Melbourne Test:

ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान संघात मंगळवारपासून (26 डिसेंबर) कसोटी मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर सुरू आहे. हा बॉक्सिंग डे कसोटी सामना असून या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एक अनोखी घटना घडली.

तिसऱ्या दिवशी काही काळ सामना चक्क तिसरे पंच (Third Umpire) रिचर्ड इलिंगवर्थ लिफ्टमध्ये अडकले होते.

झाले असे की गुरुवारी पहिल्या सत्राचा खेळ पूर्ण झाला, त्यानंतर स्थानिक वेळेनुसार दुपारी 1.25 वाजता दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू होणार होता.

दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात फलंदाजी कायम करण्यासाठी डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ हे मैदानावर आले होते. त्याचबरोबर मैदानातील दोन्ही पंचही मैदानात उपस्थित होते. मात्र, खेळ थांबवण्यात आला कारण त्यावेळी तिसरे पंच इंलिंगवर्थ त्यांच्या जागेवर उपस्थित नव्हते.

त्यामुळे काही मिनिटातच चौथे पंच फिल गिलेस्पी बाऊंड्रीवरून पळत गेले आणि तिसऱ्या पंचांच्या बॉक्समध्ये जाऊन त्यांनी ती जागा घेतली, जेणेकरून खेळ सुरू होईल. यानंतर काही वेळातच इंलिंगवर्थ त्यांची जागा घेण्यासाठी परतले. त्यांनी परत आल्यानंतर हात हालवत त्यांची खुलाशी सांगितली.

त्यांच्या अनुपस्थितीबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियाने माहिती दिली की तिसरे पंच लिफ्टमध्ये अडकल्याने खेळाला थोडा उशीर झाला. या घटनेची माहिती मिळाली, तेव्हा मैदानात असलेल्या वॉर्नरलाही हसू आवरता आले नव्हते.

दरम्यान, साधारण सात मिनिटे उशीरा दुसऱ्या सत्राचा खेळ सुरू झाला. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच वॉर्नरने विकेट गमावली. त्याने 6 धावा केल्या. त्याला मीर अझमाने त्रिफळाचीत केल्यानंतर पुढच्याच चेंडूवर ट्रेविस हेडलाही त्याने त्रिफळाचीत केले.

त्याआधीच ऑस्ट्रेलियाने उस्मान ख्वाजा आणि मार्नस लॅब्युशेन यांनी स्वस्तात विकेट गमावल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची अवस्था 16 धावांवर 4 विकेट्स अशी झाली होती.

मात्र त्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि मिचेल मार्श यांनी दीडशतकी भागीदारी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. या भागीदारीदरम्यान तिसऱ्या दिवशी स्मिथने अर्धशतक केले, तर मार्शचे शतक थोडक्यात हुकले. तो 96 धावांवर बाद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची आघाडी २०० धावांच्या पुढे गेली आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 318 धावा केल्या होत्या. त्यानंतर पाकिस्तानने पहिल्या डावात सर्वबाद 264 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 54 धावांची आघाडी मिळाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

SCROLL FOR NEXT