Ramiz Raja & Sourav Ganguly Dainik Gomantak
क्रीडा

IND vs PAK: ‘चार देशांच्या मालिकेसाठी गांगुलीशी बोलणार’

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष रमीझ राजा यांनी पुन्हा एकदा भारतासोबत क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष रमीझ राजा यांनी पुन्हा एकदा भारतासोबत क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भारताला स्वारस्य नसतानाही, चार देशांच्या एकदिवसीय स्पर्धेबद्दल बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्याशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. (PCB Chairman Ramiz Raja has once again expressed his desire to play cricket with India)

रमीझ यांनी कराचीतील नॅशनल स्टेडियमवर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ‘आम्ही भारत आणि पाकिस्तान व्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंडच्या (England) संघांचा समावेश असलेल्या स्पर्धेचा प्रस्ताव दिला आहे.’ भारत आणि पाकिस्तानमधील खेळाडूंना एकमेकांविरुद्ध खेळण्याची अधिक संधी देणे आणि आयसीसीच्या इतर सदस्य देशांचे उत्पन्न वाढवणे हा यामागचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

पीसीबी चेअरमन म्हणाले, "मी दुबईत होणाऱ्या एसीसीच्या बैठकीत याबाबत सौरव गांगुलीशी बोलणार आहे. आम्ही दोघेही माजी कर्णधार आणि खेळाडू आहोत. आमच्यासाठी क्रिकेट हे राजकारणापेक्षा वेगळे आहे."

"भारताने सहमती दर्शवली नाही तरी, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसह तीन देशांची स्पर्धा पाकिस्तानमध्ये (Pakistan) खेळवली जाऊ शकते," असेही त्यांनी यावेळी म्हटले.

दरम्यान, पुढील वर्षी आशिया कप खेळण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानात येईल, असा विश्वास देखील रमीझ राजा यांनी व्यक्त केला. "मला वाटते ते येतील. जर ते आले नाहीत तर काय करता येईल ते आम्ही पाहू," असंही त्यांनी म्हटले आहे.

शिवाय, बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jai Shah) यांनी रमीझ राजा यांचा प्रस्ताव आधीच नाकारला आहे. कारण भारताचा उद्देश खेळाचे जागतिकीकरण असून अल्पकालीन आर्थिक फायदा घेणे नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT