पाकिस्तान संघासाठी 2021 हे वर्ष खूप चांगले गेले. स्टार फलंदाज बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाने अनेक महत्त्वाचे विजय संपादन केले. मात्र, या संपूर्ण वर्षात बाबर आणि संपूर्ण संघासाठी सर्वाधिक महत्त्वाचा विजय भारताविरुद्धच होता. यंदाच्या T20 विश्वचषकात (T20 World Cup) पाकिस्तानने (Pakistan) भारताचा पराभव केला. विश्वचषकात पाकिस्तानने भारताला हरवण्याची ही पहिलीच वेळ होती.
T20 विश्वचषक-2021 मध्ये भारत आणि पाकिस्तान एकाच गटात होते. शाहीन आफ्रिदीसमोर भारताची फलंदाजीने हात टेकले. टीम इंडियाला (Team India) केवळ 152 धावा करता आल्या. पाकिस्तानने एकही विकेट न गमावता हे लक्ष्य साध्य केले. मोहम्मद रिझवानने 79 आणि बाबर आझमने (Babar Azam) 68 धावा केल्या. या सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) भारताकडून सर्वाधिक 57 धावांची शानदार कामगिरी केली.
टीम इंडियाला हरवणे हा सर्वोत्तम क्षण
“एक संघ म्हणून आमच्यासाठी ही एक मोठी उपलब्धी होती. कारण आम्ही इतकी वर्षे विश्वचषकात भारताला पराभूत करु शकलो नाही. आमच्यासाठी तो वर्षातील सर्वोत्तम क्षण होता. भारताविरुद्धच्या पहिल्या विश्वचषक विजयानंतर चाहत्यांकडून मिळालेला प्रतिसाद जबरदस्त होता. भारताविरुध्दच्या सामन्यात आमच्या सांघिक कामगिरी केली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) जारी केलेल्या पॉडकास्टमध्ये बाबर म्हणाला, त्याच स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत होणे हा आमच्या संघासाठी सर्वात निराशाजनक क्षण होता.
पाकिस्तानचा विजय भारताला महागात पडला
पाकिस्तानचा हा शानदार विजय भारताला चांगलाच महागात पडला. या पराभवानंतर भारताला पुढील सामन्यात न्यूझीलंडविरुद्धही पराभव स्वीकारावा लागला. यामुळे तो उपांत्य फेरीत जाऊ शकला नाही. साखळी फेरीनंतर टीम इंडिया स्पर्धेतून बाहेर पडली होती. तर दुसरीकडे पाकिस्तानने त्यांचे सर्व साखळी सामने जिंकून उपांत्य फेरीत धडक मारली. चाहते आणि दिग्गज पाकिस्तानला विजयाचा दावेदार मानत होते. मात्र, संघाचा प्रवास उपांत्य फेरीतच संपुष्टात आला. अंतिम फेरीत न्यूझीलंडचा पराभव करुन ऑस्ट्रेलियाने विजेतेपद पटकावले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.