Pat Cummins - Virat Kohli 
क्रीडा

'मृत्युशय्येवर असेल, तरी विराटची विकेट...', कमिन्सची World Cup फायनलबाबत पुन्हा एकदा मोठी प्रतिक्रिया

Pat Cummins on Virat Kohli Wicket: पॅट कमिन्सने वर्ल्डकप 2023 फायनलमध्ये विराटची विकेट घेतल्यानंतर स्टेडियममध्ये पसरलेल्या शांततेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

Pat Cummins said he will remember Virat Kohli's Wicket at World Cup 2023 Final for long time:

साल 2023 ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्ससाठी खास ठरला आहे. त्याने या वर्षात जूनमध्ये कसोटी चॅम्पियनशीपचे विजेतेपद जिंकले, त्यानंतर नुकतेच वनडे वर्ल्डकपही उंचावला. दरम्यान, कमिन्सने वर्ल्डकपमध्ये विराट कोहलीची घेतलेली विकेटची बरीच चर्चा झाली आहे, आता याबाबत कमिन्सने प्रतिक्रिया दिली आहे.

कमिन्सने म्हटले आहे की विराटची विकेट त्याला अखेरच्या श्वासापर्यंत लक्षात राहिल. 19 नोव्हेंबर रोजी झालेल्या वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्सने विजय मिळवला होता.

या सामन्यात विराटची विकेटही ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाची ठरली होती. तो यंदाच्या स्पर्धेत तुफान फॉर्ममध्ये खेळत होता. या सामन्यात विराट 54 धावांवर असताना त्याला कमिन्सने त्रिफळाचीत केले होते. त्यामुळे 1 लाखाहून अधिक आसन क्षमता असलेल्या अमहमदाबादच्या स्टेडियममध्ये शांतता पसरली होती.

विशेष म्हणजे कमिन्सने या सामन्यापूर्वी म्हटले होते की 'मोठ्या प्रेक्षक संख्येला शांत करण्यापेक्षा मोठा आनंद नसेल. हेच आमचे उद्दिष्ट आहे.' कमिन्सने विराटची विकेट घेत त्याचे हे शब्द राखले देखील होते.

दरम्यान, आता वर्ल्डकप जिंकून एक आठवडा उलटल्यानंतरही याबद्दल चर्चा सुरू आहे. नुकतेच एका पत्रकाराने ज एजला दिलेल्या मुलाखतीत कमिन्सला विचारले होते की '70 वर्षांनंतर जेव्हा तू मृत्युशय्येवर असशील, तेव्हा वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यातील कोणता क्षण तुला आठवेल?'

त्यावर कमिन्स म्हणाला, 'मला वाटते की विराट कोहलीची विकेट. मी नक्कीच उत्साहात होतो. त्यानंतर आम्ही हडल केले (गोलाकार एकत्र उभे राहिलो.). तेव्हा स्टीव्ह स्मिथ म्हणाला, 'बॉईज, प्रेक्षकांना एक सेंकद ऐका. आणि आम्ही एक क्षण थांबलो, तेव्हा तिथे वाचनालयात असते, तशी शांतता होती. लाखाहून अधिक भारतीय तिथे होते आणि तरीही शांतता होती. तो क्षण माझ्या बराच काळ लक्षात राहिलं.'

दरम्यान, विराट बाद झाल्याने त्याची केएल राहुलबरोबरची 67 धावांची भागीदारी देखील संपुष्टात आली होती. विराटची विकेट गेल्यानंतर केएल राहुल देखील 66 धावांवर बाद झाला. त्यानंतर भारताचा डाव झटपट 240 धावांत संपला. 50 षटकात भारताने सर्व विकेट्स गमावल्या. विराट आणि राहुलपूर्वी रोहित शर्माने 47 धावांची खेळी केली.

ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तर जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच ग्लेन मॅक्सवेल आणि ऍडम झम्पाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्यानंतर 241 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 47 धावांवर 3 विकेट्स गमावल्या होत्या. पण त्यानंतर ट्रेविस हेड आणि मार्नस लॅब्युशेन यांनी 192 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला विजयापर्यंत पोहचवले. हेडने 120 चेंडूत 15 चौकार आणि 4 षटकारांसह 137 धावांची खेळी केली. लॅब्युशेन 110 चेंडूत 4 चौकारांसह 58 धावांवर नाबाद राहिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT