Pat Cummins ICC
क्रीडा

World Cup 2023: कमिन्सने करून दाखवले! अहमदाबादमधील 1.3 लाख चाहत्यांना एका क्षणात केलं चिडीचूप

Pat Cummins: ऑस्ट्रेलियन कर्णधार कमिन्सने वर्ल्डकप 2023 फायनलपूर्वी केलेलं त्याचं भाष्य भारताविरुद्ध अहमदाबादमध्ये खेळताना खरं करून दाखवलं आहे.

Pranali Kodre

Pat Cummins kept his Words in India vs Australia ODI Cricket World Cup 2023 Final:

रविवारी (19 नोव्हेंबर) वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचे विजेतेपद ऑस्ट्रेलियाने जिंकले. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियाने यजमान भारतीय संघाला 6 विकेट्सने पराभूत केले.

ऑस्ट्रेलियाच्या या विजयानंतर पॅट कमिन्सच्या एका वक्तव्याची प्रचंड चर्चा रंगली आहे. कमिन्सने अंतिम सामन्यापूर्वी म्हटले होते की भारतीय चाहत्यांना शांत करण्याचं आव्हान असल्याचे म्हटले होते. अखेर त्याने हे आव्हान पूर्ण केल्याची चर्चा चाहत्यांमध्ये सुरू आहे.

खरंतर नरेंद्र मोदी स्टेडियम जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. या स्टेडियमची १ लाख ३२ हजार आसन क्षमता आहे. दरम्यान, अंतिम सामन्यावेळी हे स्टेडियम खचाखच भरल्याचे दिसले. तसेच या स्टेडियमवर मोठ्या संख्येने भारतीय चाहते उपस्थित होते, तर अगदी कमी प्रमाणात ऑस्ट्रेलियन समर्थक होते.

दरम्यान, अंतिम सामन्यासाठी मोठ्या प्रमाणात भारतीय समर्थक स्टेडियमवर असणार हे अपेक्षित होते, त्याचबद्दल सामन्याच्या पूर्वसंध्येला कमिन्सला विचारण्यात आले होते.

त्यावेळी पत्रकार परिषदेत कमिन्स म्हणाला होता 'स्पर्धा भारतात होत आहे, त्यामुळे सहाजिकच अंतिम सामन्यासाठी भारतीय चाहते मोठ्या प्रमाणात स्टेडियममध्ये असतील. पण इतक्या मोठ्या प्रेक्षक संख्येला शांत करण्यापेक्षा मोठा आनंद नसेल. हेच आमचे उद्दिष्ट आहे.'

अखेर कमिन्सने त्याचे हे वक्तव्य खरे करून दाखवले आहे. कारण त्याने गोलंदाजी करताना श्रेयस अय्यरला 4 धावांवर आणि विराट कोहलीला 53 धावांवर बाद केले.

ज्यावेळी त्याने या दोन्ही विकेट्स घेतल्या, विशेषत: भारतीय संघ धावा करताना संघर्ष करत असतानाच विराटला त्रिफळाचीत केले तेव्हा संपूर्ण स्टेडियममध्ये शांतता पसरली होती. तसेच सामना भारताने गमावल्यानंतरही संपूर्ण स्टेडियम शांत झाले होते.

अंतिम सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर भारताने ऑस्ट्रेलियासमोर 241 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने 43 षटकात 4 विकेट्स गमावत पूर्ण केला. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेडने शतकी खेळी केली, तर मार्नस लॅब्युशेनने अर्धशतक केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT