Parul Chaudhary Dainik Gomantak
क्रीडा

Parul Chaudhary: शेतकऱ्याच्या पोरीची आता ऑलिम्पिक वारी! पारुलचं पदक हुकलं पण इतिहास घडला

World Athletics Championships 2023: वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप 2023 स्पर्धेत एकीकडे नीरज चोप्राने जिंकले तर दुसरीकडे भारताच्याय पारुल चौधरीनंही इतिहास घडवला आहे.

Pranali Kodre

Parul Chaudhary Qualified for Paris Olympics with India national 3000m steeplechase record:

वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप 2023 स्पर्धेत रविवारी (27 ऑगस्ट) रात्री विविध क्रीडा प्रकारातील अंतिम फेऱ्या पार पडल्या. यातील पुरुष भालाफेक, महिला ३००० मीटर स्टीपलचेस आणि पुरुष 4x400 मीटर रिले या तीन क्रीडा प्रकारात भारतीय खेळाडूंचा समावेश होता. या स्पर्धांमध्ये इतिहासह घडले.

दरम्यान, पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने 88.17 मीटर भाला फेकीसह सुवर्णपदक जिंकले. तसेच याच स्पर्धेत भारताचा किशोर जेना 84.77 मीटर भाला फेकत पाचव्या क्रमांकावर राहिला, तर डीपी मनू 84.14 मीटर भाला फेकीसह सहाव्या क्रमांकावर राहिला. नीरज या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला

पारुल चौधरीने रचला इतिहास

महिला 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात भारताच्या पारुल चौधरीने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. तिने क्वालिफिकेशन फेरीत  9:24.29 सेकंदाची वेळ नोंदवत अंतिम फेरी गाठली होती.

अंतिम फेरीत ती 9:15.31 सेकंद वेळ नोंदवत 11 व्या क्रमांकावर राहिली. तिचे पदक हुकले, मात्र तिने नोंदवलेली वेळ ही राष्ट्रीय विक्रम ठरली. त्याचमुळे आता महिला ३००० मीटर स्टीपलचेस प्रकारात तिच्या नावावर राष्ट्रीय विक्रम नोंदवला गेला आहे.

तिने हा विक्रम करताना 2016 मध्ये ललिता बाबरने रचलेला विक्रम मोडला आहे. ललिताने 2016 ऑलिम्पिकमध्ये 9:19.76 सेकंद वेळ नोंदवली होती.

इतकेच नाही, तर पारुलने पुढीलवर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकचे तिकिटही पक्के केले आहे. पॅरिस ऑलिम्पिकसाठी 9 मिनिटे 23 सेकंद इतकी पात्रता असल्याने तिचे स्थान पक्के आहे.

28 वर्षीय पारुलने इथपर्यंत पोहचण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला आहे. उत्तर प्रदेशमधील मेरठजवळील इक्लौता गावात शेतकरी असलेल्या तिच्या वडिलांनीच तिला पुढे जाण्यासाठी प्रोस्ताहन दिले. तिने 2019 मध्ये पहिल्यांदा 5000 मीटरमध्ये राष्ट्रीय यश मिळवले होते.

रिले संघाचे हुकले पदक

रविवारी रात्री पुरुष 4x400 मीटर रिलेचीही अंतिम फेरी पार पडली. भारताच्या रिले संघाने सेमीफायनल हिटमध्ये शनिवारी 2 मिनिटे 59.05 सेकंदाचा वेळ नोंदवत आशियाई विक्रम करत अंतिम फेरीत धडक मारली होती.

मात्र अंतिम फेरीत 2:59.92 सेकंद इतकी वेळ नोंदवत भारतीय संघ 5 व्या क्रमांकावर राहिला. भारतीय रिले संघात मोहम्मद अनास याहिया, अमोज जेकॉब, मोहम्मद अजमल वरियाथोडी आणि राजेश रमेश यांचा समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT