Goa Chess Competition  Dainik Gomantak
क्रीडा

अखिल गोवा राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत पार्थ, अस्मिता यांना विजेतेपद

अखिल गोवा राज्यस्तरीय 18 वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात पार्थ साळवी याने, तर मुलींत अस्मिता रे हिने विजेतेपद मिळविले.

Kishor Petkar

Goa Chess Competition : अखिल गोवा राज्यस्तरीय 18 वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात पार्थ साळवी याने, तर मुलींत अस्मिता रे हिने विजेतेपद मिळविले.

डिचोली-सत्तरी तालुका बुद्धिबळ संघटनेने गोवा (Goa Chess Association) बुद्धिबळ अस्थायी समितीच्या मान्यतेने घेतलेली स्पर्धा डिचोली येथील नारायण झांट्ये महाविद्यालय संकुलात झाली. (Parth Asmita wins in All Goa State Chess Tournament)

खुल्या गटात पार्थ व मंदार लाड यांचे प्रत्येकी सहा डाव खेळल्यानंतर समान साडेपाच गुण झाले. टायब्रेकर गुणांत पार्थ विजेता, तर मंदार उपविजेता ठरला. रुबेन कुलासो, अथर्व काटकर, प्रतीक बोरकर, तेजस शेट वेरेकर यांना अनुक्रमे तिसरा ते सहावा क्रमांक मिळाला.

मुलींत अव्वल ठरलेल्या अस्मिता हिने सर्व पाचही डाव जिंकले. तन्वी हडकोणकर चार गुणांसह उपविजेती ठरली. नेत्रा सावईकर, वालंका फर्नांडिस, अलाना आंद्राद, सयुरी नाईक यांनी अनुक्रमे तिसरा ते सहावा क्रमांक मिळविला. दोन्ही गटातील पहिले दोन स्पर्धक राष्ट्रीय 18 वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेत गोव्याचे (Goa) प्रतिनिधित्व करण्यास पात्र ठरले आहेत. स्पर्धा तमिळनाडूतील कोईंबतूर येथे 18 ते 23 एप्रिल या कालावधीत होईल.

याशिवाय वयोगटात रिशित गावस, आर्यन नाईक, शुभ बोरकर, सरस पोवार, कनिष्क सावंत, ह्रदय मोरजकर, महादेव सावंत, पार्थ कामत, प्रतीक भोवार, चैतन्य गावकर, प्रतीक मालवणकर, अभिषेक मयेकर, शुबान मालकर यांना खुल्या गटात, तर मुलींत स्कायला रॉड्रिग्ज, म्युरियल फर्नांडिस, वैष्णवी परब, सय्यद मैझा, सय्यद माहदिया, वीरजा देसाई यांनाही बक्षीस देण्यात आले.

डिचोलीचे उपजिल्हाधिकारी दीपक वायगणकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. यावेळी गोवा बुद्धिबळ अस्थायी समितीचे निमंत्रक सचिन आरोलकर, राजन कडकडे, सत्यवान हरमलकर, सुभाषचंद्र गावस, गिरीश गाडगीळ, नीलेश धारगळकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT