IPL 2024 Promo Video 
क्रीडा

IPL 2024 Promo Release: आयपीएलचे बिगुल वाजले! प्रोमो व्हिडिओमध्ये झळकले पंड्या, पंत, अय्यर आणि राहुल

IPL 2024: 22 फेब्रुवारीला IPL 2024 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीमुळे केवळ १७ दिवसांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे

Ashutosh Masgaunde

Promotional Video of IPL 2024 Released:

जगातील सर्वात मोठी लीग क्रिकेट स्पर्धा जी अनेकांसाठी उत्सव आहे, त्या आयपीएलचा 17 वा हंगाम अवघ्या काही दिवासांतच म्हणजे 22 मार्चपासून सुरू होत आहे.

याच पार्श्वभूमीवर या स्पर्धेचे अधिकृत प्रसारण भागीदार स्टार स्पोर्ट्सने हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर तसेच केएल राहुल यांचा समावेश असलेला एक प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे. जो सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातल आहे.

स्टार स्पोर्ट्स इंडियाने आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमाराह आयपीएलचा प्रोमो एक्स वर शेअर केला आसून, चाहत्यांचा याला मोठ प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान एक्सवर हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर अवघ्या तासाभरात याला 15 हजारांपेक्षा जास्त व्हिव्ज मिळाल्या आहेत.

यंदाचा 17 वा आयपीएल हंगाम 22 मार्चपासून सुरू होत आहे. स्पर्धेचा पहिला सामना चेपॉक स्टेडियम, चेन्नई येथे होणार आहे.

आयपीएल 2024 ची सुरुवात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याने होणार आहे.

22 फेब्रुवारीला IPL 2024 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीमुळे केवळ १७ दिवसांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे

चेन्नई येथे 22 मार्च रोजी इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 हंगामाच्या पहिल्या सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने काही दिवसांपूर्वी आयपीएलच्या पहिल्या 17 दिवसांचे वेळापत्रक जाहीर केले. आ

गामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उर्वरित आयपीएल सामन्यांचे वेळापत्रक पुढील महिन्याच्या सुरुवातीला जाहीर केले जाईल. स्पर्धेच्या पहिल्या 17 दिवसात 21 सामने खेळवले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT