Lata Mangeshkar  Dainik Gomantak
क्रीडा

पाकिस्तानी खेळाडूही लता दीदींच्या गाण्यांचे चाहते

लता दीदीच्याच्या निधनावर पाकीस्तानी खेळाडूंची सोशल मिडियावर श्रद्धांजली वाहली आहे.

दैनिक गोमन्तक

रविवारी प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनाबद्दल जगभरातील चाहत्यांनी शोक व्यक्त केला आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्या नेहमीच लोकांच्या हृदयामध्ये असतील असे सांगितले. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी लता मंगेशकर यांच्या निधानबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात हातावर काळी पट्टी बांधली होती. लता दीदींच्या आवाजाचे केवळ भारतातच (India) नव्हे तर पाकिस्तानमध्ये देखील त्यांच्या गाण्यांचे चाहते आहेत.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमने त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. बाबर आझम यांनी इन्स्टाग्राम (Instagram) पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केले आहे. त्याने लिहिले आहे की, सुवर्ण युगाचा शेवट. त्यांचा जादुई आवाज आणि वारसा जगभरातील लाखो लोकांच्या हृदयात जीवंत राहील. रिप लता मंगेशकर.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी रविवारी गायिका लता मंगेशकर यांच्या निधानाबद्दल शोक व्यक्त केला आणि त्या"दयाळूपणाच्या प्रतीक" होत्या. राजा यांनी ट्वीट केले की, लता मंगेशकर कृपा, नम्रता आणि साधेपणाच्या प्रतीक होत्या आणि म्हणूनच त्या महान आहेत. किशोर कुमार आणि आता लता मंगेशकर यांच्या मृत्यूने माझ्यातील संगीत तुटले आहे.

लता मंगेशकर यांच्या मधुर आवाजासाठी त्यांना भारताची कोकिळा म्हणून ओळखले जात असे. 1942 मध्ये वयाच्या 13 व्या वर्षी त्यांनी आपल्या करिअला सुरुवात केली. सात दशकांच्या कारकिर्दीत लताजीनी एक हजराहून अधिक हिंदी चित्रपटांसाठी गाणी रेकॉर्ड केली. त्यांनी छत्तीसहून अधिक प्रादेशिक भारतीय भाषा आणि परदेशी भाषांमध्ये गाणी गायली. रविवारी लता मंगेशकर यांचे निधन (Lata Mangeshkar passes away) झाले आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लतादिदींना कोरोनासोबतच न्यूमोनियाची लागण झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT