लतादीदींनी सचिनला दिला होता क्रिकेट न सोडण्याचा सल्ला

“मी तो दिवस कधीच विसरणार नाही, जेव्हा सचिनने मला पहिल्यांदा आई म्हटले. माझ्यासाठी ते थक्क करणारे होते.“
Sachin Tendulkar And Lata Mangeshkar
Sachin Tendulkar And Lata MangeshkarDainik Gomantak
Published on
Updated on

भारतरत्न लता मंगेशकर कायमच्या नि:शब्द झाल्या आहेत. मात्र त्यांचा आवाज हा लोकांच्या कानात सतत गुंजत राहील. रविवारी सकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या 28 दिवसांपासून त्या रुग्णालयात दाखल होत्या. त्यांच्या निधनाने संपूर्ण देश दु:खी झाला आहे. (Sachin Tendulkar And Lata Mangeshkar)

लता मंगेशकर यांचे पहिले प्रेम संगीत होते हे सर्वांना माहित आहे, पण त्याची क्रिकेटची आवडही होती. त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचे सामने पाहण्याची संधी कधीच सोडली नाही. सचिन तेंडुलकर हा त्यांचा आवडता क्रिकेटर होता. ही गोष्ट कोणापासून कधीही लपून राहिलेली नाही. सचिनच्या खेळाबद्दल त्यांनी अनेकदा आपलं मत व्यक्त केलं.ही गोष्ट कोणापासून लपून राहिलेली नाही.

Sachin Tendulkar And Lata Mangeshkar
India 1000th ODI: जाणून घ्या वनडे टीम इंडियाचा 1974 ते 2022 पर्यंतचा विक्रम

सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)आणि लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे नाते खूप खास होते. दोघांनाही एकमेकांबद्दल खूप आदर असायचा. त्यांच्या नात्यातील एक अत्यंत खास गोष्ट म्हणजे दरवर्षी ते एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला विसरत नव्हते. सचिनसाठी लता मंगेशकर या आईसारख्याच होत्या. असे सचिनने अनेकदा सांगितले आहे. लता मंगेशकर यांनी ही स्वतः सचिनसोबतच्या नात्याबद्दल अनेकदा खुलासे केले, "सचिन मला आई प्रमाणे मानतो आणि मी सुध्दा त्याच्या आरोग्यासाठी आणि चांगल्या कामगिरी करण्यासाठी प्रार्थना करते."

सचिनने 'आई' उच्चारताच लतादीदी भावूक

लता मंगेशकर यांनी काही दिवसांपूर्वी एक किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या की, सचिनने जेव्हा पहिल्यांदा फोन केला तेव्हा त्या भावूक झाल्या होत्या आणि कारण होते सचिनने उच्चारलेला शब्द तो म्हणजे 'आई'. त्यावर त्या म्हणाल्या की, “मी तो दिवस कधीच विसरणार नाही, जेव्हा सचिनने मला पहिल्यांदा आई म्हटले होते. माझ्यासाठी ते थक्क करणारे होते. कारण सचिन असं काही बोलेल, अशी मला अपेक्षाही नव्हती. त्यांच्या तोंडून हे शब्द ऐकून मी भावूक झाले. मला सचिनसारखा मुलगा मिळाल्याने मी स्वतःला खूप भाग्यवान समजते.

सचिनला भारतरत्न देण्याबाबतही केली शिफारस

2017 मध्ये मास्टर ब्लास्टरवर सचिन: अ बिलियन ड्रीम्स (Sachin: A Billion Dreams) ही डॉक्युमेंट्री आला होती. लता मंगेशकर यांनी या डॉक्युमेंट्री वर ट्विट केले आणि त्यात म्हटले की, "नमस्कार, तुमच्या आगामी चित्रपटात तुम्ही क्रिकेटच्या मैदानाप्रमाणे चौकार-षटकार मारून धम्माल करावी, हीच इच्छा." यावर सचिनने लिहिले की, 'आईच्या आशीर्वादाशिवाय चौकार-चौकार होत नाहीत. मला तुम्ही आईसारखे आहेत. तुमच्या आशीर्वादाबद्दल धन्यवाद." सचिनला 2014 मध्ये भारतरत्न मिळाला होता. मात्र लता मंगेशकर यांनी त्याआधी अनेक प्रसंगी सचिनला देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची मागणी सुध्दा केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com