Virat Kohli And Suryakumar Yadav Dainik Gomantak
क्रीडा

Ind Vs Hk: विराट अन् सूर्यकुमार यादवची पाकिस्तानी पत्रकाराने उडवली खिल्ली

Virat Kohli And Suryakumar Yadav: फिरोजने ट्विटरवर लिहिले की, 'बाबरची खेळी विराट आणि सूर्याच्या खेळीपेक्षा चांगली होती.'

दैनिक गोमन्तक

Virat Kohli And Suryakumar Yadav: पाकिस्तानी पत्रकार अरफा फिरोज जेकने भारत आणि हाँगकाँग यांच्यातील सामन्यानंतर असे ट्विट केले, ज्यामुळे तो भारतीय चाहत्यांच्या निशाण्यावर आला. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनी हाँगकाँगविरुद्ध अर्धशतक ठोकले, त्यानंतर बाबर हयातने हाँगकाँगकडून 41 धावांची शानदार खेळी खेळली. फिरोजने ट्विट करत म्हटले की, 'बाबरची खेळी विराट आणि सूर्याच्या खेळीपेक्षा चांगली होती.'

दरम्यान, अरफा फिरोज जेकने ट्विटमध्ये म्हटले की, 'भारताविरुद्ध बाबर हयातच्या 41 धावा विराट कोहलीच्या (Virat Kohli) 59 आणि सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) 68 धावांपेक्षा सरस होत्या. हाँगकाँगच्या (Hong Kong) गोलंदाजीसमोर भारताच्या फलंदाजांनी या धावा केल्या. तर विराट आणि सुर्याने हाँगकाँगच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. विराटने कमकुवत संघाविरुद्ध धावा केल्या असल्या तरी त्याचे नेहमीच कौतुक करणे आवश्यक नाही.' त्यानंतर भारतीय चाहत्यांच्या निशाण्यावर फिरोज आला.

दुसरीकडे, या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, टीम इंडियाने हाँगकाँगविरुद्ध 20 षटकात 2 बाद 192 धावा केल्या. विराट 59 आणि सूर्यकुमार यादव 68 धावा करुन नाबाद परतले. दोघांनी तिसर्‍या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी केली. प्रत्युत्तरात हाँगकाँगचा संघ 20 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 152 धावाच करु शकला आणि भारताने हा सामना 40 धावांनी जिंकला. बाबर हयातने 35 चेंडूत 41 धावांचे योगदान दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

Mapusa: पाणीपुरवठा ऑफिसमध्ये नेल्या गढूळ पाण्याच्या बाटल्या! म्हापशातील प्रश्न ऐरणीवर; काँग्रेसचा घागर मोर्चाचा इशारा

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

SCROLL FOR NEXT