Pakistani Cricketer Khalid Latif Sentenced To 12 Years Dainik Gomantak
क्रीडा

डच खासदाराच्या हत्येचा आरोप, पाकिस्तानी क्रिकेटपटूला नेदरलँडमध्ये 12 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

Pakistani Cricketer Khalid Latif: आशिया कपमध्ये भारताविरुद्धच्या सामन्यादरम्यान पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी आली आहे.

Manish Jadhav

Pakistani Cricketer Khalid Latif Sentenced To 12 Years: आशिया कपमध्ये भारताविरुद्धच्या सामन्यादरम्यान पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी आली आहे. नेदरलँडच्या न्यायालयाने एका पाकिस्तानी क्रिकेटपटूला 12 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

खालिद लतीफवर डच नेते ग्रीट वाइल्डर्स यांच्या हत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप होता. रिपोर्ट्सनुसार, लतीफचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये लतीफने ग्रीट वाइल्डर्स यांचे शीर आणणाऱ्या व्यक्तीला 21 हजार युरो देण्यासंबंधी वक्तव्य केले होते.

दरम्यान, वाइल्डर्स यांनी 2018 मध्ये पैगंबर मोहम्मद यांच्यावर कार्टून स्पर्धा आयोजित करण्याबाबत भाष्य केले होते. तथापि, वाइल्डर्सच्या या वक्तव्यानंतर निषेध सुरु झाला होता. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या.

यानंतर त्यांनी स्पर्धा आयोजित करण्यास नकार दिला. याचदरम्याम, पाकिस्तानी क्रिकेटपटू लतीफने एक व्हिडिओ जारी करुन वाइल्डर्स यांचे शीर आणणाऱ्याला बक्षीस जाहीर केले होते.

लतीफ शिक्षा भोगेल का?

खालिद लतीफ सध्या पाकिस्तानात (Pakistan) आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतरच तो पाकिस्तानात परतला होता. या खटल्यातील सुनावणीदरम्यान लतीफ एकदाही न्यायालयात हजर झाला नाही किंवा त्याला या प्रकरणात अटकही झाली नाही. अशा परिस्थितीत शिक्षा सुनावल्यानंतर तो आपली शिक्षा भोगेल, अशी शक्यता कमी आहे.

कोण आहे खालिद अहमद, जाणून घ्या त्याची क्रिकेट कारकीर्द

पाकिस्तानी क्रिकेटपटू खालिद अहमदने 5 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि 13 टी-20 सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याने एका अर्धशतकाच्या सहाय्याने 29.40 च्या सरासरीने एकूण 147 धावा केल्या आहेत, तर T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने 21.54 च्या सरासरीने 237 धावा केल्या आहेत.

लतीफने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2016 मध्ये खेळला होता. लतीफ 2010 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधारही होता. 2017 मध्ये, स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळल्यानंतर त्याच्यावर पाच वर्षांची बंदी घालण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT