Pakistan Women Team Dainik Gomantak
क्रीडा

NZ-W vs PAK-W: पाकिस्तानने सामना जिंकून रचला इतिहास, न्यूझीलंडच्या भूमीवर पहिल्यांदाच केला 'हा' पराक्रम

Pakistan Women vs New Zealand Women: पाकिस्तानच्या महिला संघाने सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडच्या महिला संघाचा 3 धावांनी पराभव केला.

Manish Jadhav

Pakistan Women vs New Zealand Women: पाकिस्तानच्या महिला संघाने सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडच्या महिला संघाचा 3 धावांनी पराभव केला. न्यूझीलंडच्या महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना 251 धावा केल्या होत्या. यानंतर पाकिस्तानी महिला संघाला 50 षटकांत 251 धावा करता आल्या. पण पाकिस्तानच्या महिला संघाने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. पाकिस्तानी महिला संघाचा न्यूझीलंडच्या भूमीवर वनडेमधला हा पहिला विजय आहे.

न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली

दरम्यान, न्यूझीलंड महिला संघाकडून अमेलिया केरने सर्वाधिक 77 धावा केल्या. तिच्याशिवाय कर्णधार सोफी डिव्हाईनने 29 आणि मॅडी ग्रीनने 65 धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही. इसाबेल गेज अवघ्या 9 धावा करुन बाद झाली. यानंतर सुजी वेट्सलाही केवळ 24 धावा करता आल्या.

बिस्माह मारुफने तूफानी खेळी खेळली

दुसरीकडे, 252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानी संघासाठी बिस्माह मारुफने शानदार फलंदाजी केली. तिने 68 धावांचे योगदान दिले. आलिया रियाझने 44, कर्णधार फातिमा सनाने 36 धावा केल्या. नतालिया परवेझने 26 धावांचे योगदान दिले. या खेळाडूंमुळेच पाकिस्तानी संघाला बरोबरी साधता आली. बिस्माहला तिच्या या शानदार खेळीसाठी 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कार मिळाला.

सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला

पाकिस्तानी संघाने सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना 11 धावा केल्या. संघाकडून फातिमा सना हिने 31 धावा आणि आलिया रियाझने 8 धावा केल्या. यानंतर, जेव्हा न्यूझीलंडचा महिला संघ सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी उतरला. त्यानंतर सादिया इक्बालने पाकिस्तानच्या गोलंदाजीची जबाबदारी घेतली. तिने आपल्या षटकात केवळ 8 धावा दिल्या आणि दोन महत्त्वपूर्ण विकेटही घेतल्या. तिच्या विस्फोटक गोलंदाजीमुळेच पाकिस्तानी संघ सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकण्यात यशस्वी ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT