T20 World Cup 2026 Dainik Gomantak
क्रीडा

T20 World Cup 2026: पाकड्यांची नाचक्की! 148 धावांच्या टार्गेटसमोर नेदरलँडच्या गोलंदाजांनी पाकला नाचवलं; बाबर-आगा 'सपशेल फेल'

PAK vs NED: टी-२० विश्वचषक २०२६ च्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँडवर ३ गडी राखून निसटता विजय मिळवला आहे.

Sameer Amunekar

टी-२० विश्वचषक २०२६ च्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँडवर ३ गडी राखून निसटता विजय मिळवला आहे. या सामन्यात नेदरलँडने पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले होते. विजयासाठी मिळालेल्या १४८ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना पाकिस्तानची अवस्था एका वेळी बिकट झाली होती, मात्र अष्टपैलू फहीम अशरफने शेवटच्या षटकांत केलेल्या फटकेबाजीमुळे पाकिस्तानने हा सामना खिशात घातला.

नेदरलँडची झुंजार फलंदाजी 

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. नेदरलँडची सुरुवात डळमळीत झाली असली तरी कर्णधार स्कॉट एडवर्ड्स (३७ धावा) आणि बास डी लीडे (३० धावा) यांनी डाव सावरला.

मायकल लेविट आणि कोलिन एकरमन यांनीही उपयुक्त योगदान दिले. पाकिस्तानच्या सलमान मिर्झाने भेदक मारा करत ३ बळी घेतले, तर मोहम्मद नवाज आणि अबरार अहमद यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. नेदरलँडचा संपूर्ण संघ १९.४ षटकांत १४७ धावांवर गारद झाला.

१४८ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या सलामीवीरांनी वेगवान सुरुवात केली. सॅम अयुबने १३ चेंडूत २४ धावा ठोकल्या, पण तो लवकर बाद झाला. त्यानंतर आलेल्या साहिबजादा फरहानने एक बाजू लावून धरत ३१ चेंडूत ४७ धावांची महत्त्वाची खेळी केली.

मात्र, कर्णधार सलमान अली आगा (१२) आणि स्टार फलंदाज बाबर आझम (१५) स्वस्तात बाद झाल्याने पाकिस्तानचा संघ अडचणीत सापडला. उस्मान खान तर भोपळाही फोडू शकला नाही.

फहीम अशरफचा 'फिनिशर' अवतार 

सामना शेवटच्या २ षटकांत आला तेव्हा पाकिस्तानला २९ धावांची गरज होती आणि नेदरलँडचे पारडे जड वाटत होते. अशा कठीण परिस्थितीत फहीम अशरफने आक्रमक पवित्रा घेतला.

त्याने अवघ्या ११ चेंडूत २ चौकार आणि ३ गगनभेदी षटकार खेचत नाबाद २९ धावा केल्या आणि सामना नेदरलँडच्या जबड्यातून ओढून काढला. या कामगिरीसाठी त्याला 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नेदरलँडकडून आर्यन दत्त आणि पॉल व्हॅन मीकेरेन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले, पण ते आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

Emergency Health Services: आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

SCROLL FOR NEXT