Pakistan Team Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: भारतात पोहचताच कसे झाले स्वागत? बाबर आझमसह पाकिस्तानी खेळाडूंनी अशी दिली रिॲक्शन

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघ सात वर्षांनंतर भारतात आला असून हैदराबादमध्ये त्यांचे स्वागत झाले आहे.

Pranali Kodre

Pakistan Cricketers react after reached Hyderabad for ICC Cricket World Cup 2023:

भारतात 13 वा वनडे वर्ल्डकप रंगणार आहे. या वर्ल्डकप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार असून 29 सप्टेंबरपासून सराव सामने खेळवले जाणार आहेत. त्यासाठी आता सहभागी देशांचे संघ भारतात येण्यास सुरुवात झाली आहे. पाकिस्तानचा क्रिकेट संघ देखील बुधवारी हैदराबादला पोहचला.

पाकिस्तान संघ मंगळवारी लाहोरहून निघाला होता. त्यानंतर ते दुबई मार्गाने हैदराबादला बुधवारी रात्री पोहोचले. हैदराबादमध्ये आल्यानंतर पाकिस्तान संघाचे हॉटेलमध्ये जाताना शानदार स्वागतही झाले. याबद्दल पाकिस्तान संघातील काही खेळाडूंनी सोशल मीडियावर पोस्टही केले आहेत.

Babar Azam Mohammad Rizwan Shaheen Afridi Instagram Stories

पाकिस्तान संघातील कर्णधार बाबर आझमसह अनेक खेळाडू पहिल्यांदाच भारतात खेळताना यंदा दिसणार आहेत. दरम्यान हैदराबादला पोहचल्यानंतर झालेल्या स्वागताबद्दल बाबर आझमने इंस्टाग्राम स्टोरीला फोटो शेअर केला असून कॅप्शन लिहिले आहे की 'हैदराबादमध्ये मिळालेल्या प्रेमाने आणि पाठिंब्याने भारावलो आहे.'

तसेच यष्टीरक्षक मोहम्मद रिझवानने इंस्टाग्राम स्टोरीला पोस्ट केले आहे की 'येथील लोकांकडून शानदार स्वागत झाले. सर्वकाही खूप सुरळीत झाले. आता पुढील दीड महिन्यासाठी उत्सुक आहोत.'

त्याचबरोबर वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने लिहिले की 'आत्तापर्यंत शानदार स्वागत झाले आहे.'

दरम्यान, पाकिस्तान संघ तब्बल 7 वर्षांनंतर भारतात खेळण्यासाठी आला आहे. वर्ल्डकप 2023 मध्ये पाकिस्तानला पहिला सराव सामना 29 सप्टेंबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा आहे. त्यानंतर 3 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामना खेळायचा आहे. हे दोन्ही सामने हैदराबादला होणार आहेत.

यानंतर पाकिस्तान मुख्य वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील पहिला सामना नेदरलँड्सविरुद्ध हैदराबादमध्ये 6 ऑक्टोबर रोजी खेळायचा आहे.

दरम्यान, या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान संघ वेगवान गोलंदाज नसीम शाहच्या अनुपस्थितीत खेळणार आहे. त्याला आशिया चषक 2023 स्पर्धेदरम्यान दुखापत झाल्याने या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. त्याच्या जागेवर हसन अलीला संघात संधी मिळाली आहे. पाकिस्तान संघाचे नेतृत्व बाबर आझम करणार आहे.

  • पाकिस्तान संघ - बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्लाह शफिक, मोहम्मद रिझवान, सौद शकिल, इफ्तिखर अहमद, सलमान अली आघा, मोहम्मद नवाझ, उस्मान मीर, हॅरिस रौफ, हसन अली, शाहिन आफ्रिदी, मोहम्मद वासिम.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

SCROLL FOR NEXT