Pakistani Player Refuses King Charles Meeting Dainik Gomantak
क्रीडा

ENG vs PAK: इंग्लंड दौऱ्यात पाकड्यांची नाचक्की! खेळाडूचा 'किंग चार्ल्स'ला भेटण्यास नकार; सर्फराज अहमदची हकालपट्टी

Pakistani Player Refuses King Charles Meeting: संघातून बाहेर काढल्याच्या रागातून एका पाकिस्तानी खेळाडूने थेट ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स यांची भेट घेण्यास नकार दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

Manish Jadhav

Pakistani Player Refuses King Charles Meeting: इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तान क्रिकेट संघाची अत्यंत लाजिरवाणी कामगिरी झाली. पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये मिळालेल्या मानहानीकारक पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने थेट कडक पावले उचलत तब्बल 7 खेळाडूंना संघातून बाहेरचा रस्ता दाखवला. मात्र, या कारवाईनंतर पाकिस्तान क्रिकेटमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला. संघातून बाहेर काढल्याच्या रागातून एका पाकिस्तानी खेळाडूने थेट ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स यांची भेट घेण्यास नकार दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

मालिकेतील दुसरा कसोटी सामना ऐतिहासिक लॉर्ड्सच्या

मैदानावर पार पडला, जिथे पाकिस्तानचा 194 धावांनी पराभव झाला. या पराभवानंतर पीसीबीने संघातील 7 खेळाडूंवर गाज पाडली. तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तानचा संघ आणि सपोर्ट स्टाफला क्लेरेंस हाउस येथे किंग चार्ल्स यांची भेट घेण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. 'द टेलिग्राफ'च्या अहवालानुसार, संघातून डच्चू मिळालेल्या 7 पैकी मुहम्मद अवैस जफर, आमिर जमाल, खुर्रम शहजाद आणि अली उस्मान हे चार खेळाडू या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. परंतु, एका खेळाडूने पीसीबीच्या अन्यायकारक निर्णयाचा निषेध म्हणून किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या बैठकीला उपस्थित राहण्यास ठाम नकार दिला.

फक्त खेळाडूच नव्हे, तर पीसीबीने व्यवस्थापनावरही मोठी कारवाई केली. इंग्लंड दौऱ्यावर पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षकपद भूषवणाऱ्या सर्फराज अहमदची तात्काळ हकालपट्टी करण्यात आली असून, गोलंदाजी प्रशिक्षक उमर गुललाही पदावरुन हटवण्यात आले. सर्फराजच्या जागी पाकिस्तानचे (Pakistan) एकदिवसीय आणि टी-20 प्रशिक्षक माईक हेसन यांच्याकडे आता कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सोपवण्यात आले आहे.

याशिवाय, संघाच्या निवडीवरुन मोठा गोंधळ उडाला असून पीसीबीने आपल्या निवड समितीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. इमाम उल हक आणि मोहम्मद रिझवान यांची संघात कोणत्या आधारावर निवड करण्यात आली होती, असा सवाल बोर्डाने विचारला आहे. या अंतर्गत वादाच्या आणि कारवाईच्या सत्रानंतर निवड समितीचे सदस्य मिसबाह उल हकने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. एकूणच इंग्लंड दौऱ्यातील या लाजिरवाण्या कामगिरीमुळे पाकिस्तान क्रिकेटमध्ये प्रचंड असंतोष आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा एकदम दणक्यात! सरकारकडून महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची घसघशीत वाढ; मिळालं तगडं गिफ्ट

Kumar Kushagra Century: भारतीय फलंदाजीचा नवा हुकमी एक्का! 21 वर्षाच्या पोरानं ठोकलं शानदार शतक, कांगारुंची काढली पिसं; सिलेक्टर्सचं वेधलं लक्ष

श्रीलंकन कोर्टाचा मोठा निकाल! ईस्टर साखळी बॉम्बस्फोटातील 15 दोषींना सुनावली प्रत्येकी 220 वर्षांची शिक्षा; 11 भारतीयांसह 270 बळींना न्याय

Ranji Trophy: गोव्याचा स्वप्नील अस्नोडकर आता केरळचा मुख्य प्रशिक्षक! रणजीसह वनडे-टी-20 संघाचीही जबाबदारी; 2026-27मोसमासाठी मोठी संधी

Vagator Turtle Protection: वागातोर किनाऱ्यावर कासवांची 24 तास निगराणी! ऑलिव्ह रिडलेच्या अंड्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाची कडक गस्त

SCROLL FOR NEXT