Pakistan Cricket Team Dainik Gomantak
क्रीडा

Asia Cup 2023: पाकिस्तानने केला 'हा' मोठा रेकॉर्ड, आशिया चषक स्पर्धेत एकाच संघाविरुद्ध...

Asia Cup 2023: आशिया चषक 2023 च्या पहिल्या सुपर 4 सामन्यात पाकिस्तानी संघाने बांगलादेशचा पराभव केला.

Manish Jadhav

Asia Cup 2023: आशिया चषक 2023 च्या पहिल्या सुपर 4 सामन्यात पाकिस्तानी संघाने बांगलादेशचा पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बांगलादेशला पाकिस्तानने अवघ्या 193 धावांत गुंडाळले.

प्रत्युत्तरात पाकिस्तानी संघाने अवघ्या 39.3 षटकांत 3 गडी गमावून या लक्ष्याचा पाठलाग केला. पाकिस्तानचा पुढचा सामना 10 सप्टेंबर रोजी भारताविरुद्ध होणार आहे.

इमाम-रिजवान यांची तूफानी खेळी

दरम्यान, 194 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानी संघासाठी सलामीवीर इमाम-उल-हकने अप्रतिम कामगिरी केली. इमामने या सामन्यात 84 चेंडूत 78 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 4 षटकार मारले.

त्याला मोहम्मद रिझवानची चांगली साथ मिळाली. त्याने 7 चौकार आणि 1 षटकार मारत नाबाद 63 धावा केल्या. तर फखर जमानने 20 आणि कर्णधार बाबर आझमने 17 धावा केल्या. बांगलादेशकडून तस्किन अहमद, शोरफुल इस्लाम आणि मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

यासह पाकिस्तान संघाने आशिया चषकामध्ये एक मोठा विक्रम केला. आशिया चषक स्पर्धेत एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवण्याच्या बाबतीत पाकिस्तान संघ आता पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. पाकिस्तानने (Pakistan) बांगलादेशविरुद्ध आशिया चषकात 14 सामन्यांमध्ये 13वा विजय मिळवला आहे.

एकदिवसीय आशिया कपमध्ये प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सर्वाधिक विजय:

13- पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश (14 सामने)*

12 - श्रीलंका विरुद्ध बांगलादेश (14)

11 - भारत विरुद्ध बांगलादेश (12)

10 - श्रीलंका विरुद्ध भारत (19)

10 - श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान (14)

पाकिस्तानी गोलंदाजांचा झंझावात

दुसरीकडे, हारिस रौफ आणि नसीम शाह यांच्या झंझावाती गोलंदाजीमुळे पाकिस्तानने बांगलादेशचा डाव 193 धावांत गुंडाळला.

पाकिस्तानकडून वेगवान गोलंदाज हारिस रौफने 4, नसीम शाहने 3 आणि शाहीन आफ्रिदी, फहीम अश्रफ आणि इफ्तिखार अहमदने 1-1 बळी घेतले.

मुशफिकुर रहीम आणि शाकिब अल हसन यांच्याशिवाय बांगलादेशच्या (Bangladesh) एकाही फलंदाजाला म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. पॉवर प्लेमध्येच संघाने 47 धावांत आपले पहिले 4 विकेट गमावले होते, तर 30 ते 39 षटकांत संघाने 47 धावा करुन सहा विकेट गमावल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Ganpati Special Bus: बाप्पा पावला... गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता, ST च्या 5000 ज्यादा बसेस धावणार

Ro-Ro Ferry in Goa: 56 गाड्या, 100 प्रवासी, AC केबिन, 5 मिनिटांत करा रायबंदर ते चोडण प्रवास; प्रवाशांना मोजावे लागणार 'एवढे' पैसे Video Viral

Glowing Trees Goa: अद्भुत! गर्द काळोखात, गोव्याच्या घनदाट जंगलात 'चमकणारी झाडे'

Congress: काँग्रेसच्या यशात 'संविधान वाचवा'चा वाटा, पण डॉ. आंबेडकरांशी असलेले तणावपूर्ण संबंध विसरता येईल का?

Tesla Showroom In Mumbai: इलॉन मस्कच्या 'टेस्ला' कंपनीचं मुंबईत जय महाराष्ट्र! वांद्रे-कुर्ला संकुलात भारतातलं पहिलं शो रूम सुरू

SCROLL FOR NEXT