Shoaib Malik - Sana Javed Instagram
क्रीडा

Shoaib Malik: सानियाबरोबर घटस्फोट? शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्रीबरोबर बांधली लग्नगाठ, स्वत:च दिली माहिती

Shoaib Malik Marriage: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकने तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधली असून त्याने पाकिस्तानी अभिनेत्रीबरोबर लग्न केल्याचे फोटो शेअर केले आहेत.

Pranali Kodre

Shoaib Malik married Sana Javed:

पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू शोएब मलिकने तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. याबद्दल त्यानेच सोशल मीडियावर माहिती दिली आहे. त्याने शनिवारी (20 जानेवारी) पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदबरोबर लग्न केल्याचे सांगितले.

शोएब मलिकने 2010 मध्ये भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाबरोबर लग्न केले होते. मात्र गेल्या वर्षभरापासून त्यांच्यात दूरावा आल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात झाल्या होत्या. तसेच त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनाही उधाण आले होते.

आता शोएब मलिकने स्वत:हूनच सोशल मीडियावर सनाबरोबर लग्न केले असल्याने या चर्चा खऱ्या ठरताना दिसून येत आहे.

दरम्यान, अद्याप सानिया किंवा शोएब यांनी मात्र त्यांच्या नात्याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यांच्यात घटस्पोट झाला आहे की नाही, याबद्दलही अद्याप त्यांनी अधिकृत माहिती दिली नाही.

परंतु, काही दिवसांपूर्वी सानियाने घटस्फोटासंदर्भात एक गुढ पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर पुन्हा तिच्या आणि शोएबच्या दुराव्याबद्दलच्या अफवांनी जोर धरला होता. त्यातच आता शोएबच्या तिसऱ्या लग्नाचे फोटो व्हायरल होत असल्याने खळबळ उडाली आहे.

शोएब आणि सना यांच्यात अफेअर असल्याचेही अनेकदा यापूर्वी चर्चा झाली होती. आता या अफवा सत्य असल्याचे त्यांच्या लग्नानंतर स्पष्ट झाले.

शोएबने 2002 मध्ये आयेशा सिद्दिकीबरोबर लग्न केले होते. त्याचे हे लग्न 2010 पर्यंत टिकले. त्यानंतर 2010 मध्ये त्याने सानियाशी हैदराबादमध्ये लग्न केले. सानिया आणि शोएब यांना इझहान हा मुलगाही आहे, ज्याचा जन्म 2018 साली झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT