Pakistan cricket team  Dainik Gomantak
क्रीडा

पाकिस्तान क्रिकेट संघ जुलैमध्ये श्रीलंका दौऱ्यावर

पाकिस्तानचा संघ 6 जुलैला श्रीलंकेत पोहोचणार

दैनिक गोमन्तक

पाकिस्तान क्रिकेट संघ जुलैमध्ये श्रीलंकेच्या दौऱ्यावर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. श्रीलंका क्रिकेट मीडियाने बुधवारी (22 जून) याला दुजोरा दिला. या मालिकेतील पहिला कसोटी सामना 16 ते 20 जुलै दरम्यान गाले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. त्याच वेळी, दुसरी कसोटी 24 जुलै रोजी कोलंबोतील आर प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळली जाईल.

पाकिस्तानचा संघ 6 जुलैला श्रीलंकेत पोहोचणार आहे. तो कोलंबोमध्ये तीन दिवसीय सराव सामनाही खेळणार आहे. सराव सामना 11 जुलैपासून सुरू होणार आहे. उभय संघांमधील ही कसोटी मालिका 2021-2023 ICC विश्व कसोटी चॅम्पियनशिपचा भाग आहे. पाकिस्तानने शेवटचा श्रीलंकेचा दौरा 2015 मध्ये केला होता. त्यानंतर त्यांनी तीन कसोटी सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. त्या दौऱ्यात पाकिस्तानने मर्यादित षटकांचे सामनेही खेळले.

श्रीलंकेचा संघ सध्या घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळत आहे. टी-20 सामने झाले आणि एकदिवसीय मालिका सुरू आहे. यानंतर दोन कसोटी सामने खेळवले जातील. ऑस्ट्रेलियाचा श्रीलंका दौरा 12 जुलैला संपणार आहे. चार दिवसांनंतर पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील पहिली कसोटी सुरू होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GCA: 'जीसीए'च्या तुळशीदास शेट्ये, हरीश शिंदेंना अटकपूर्व जामीन! सरकारी ऑडिटरला डांबून ठेवल्याचा, दबाव आणल्याचा आरोप

फोटोला द्या 80s चा Retro Look! ChatGPT चे हे भन्नाट Prompts वापरा, काही सेकंदांत बदलेल संपूर्ण लूक

Nepal Flood: पीडितांचे हात सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला; आसाम, नेपाळसाठी 3 टन मदतसामग्री गोव्‍यातून रवाना

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

SCROLL FOR NEXT