‘अजिंक्य बुद्धिबळ’ स्पर्धेत सनम गावडे अव्वल

गावडे याने अव्वल तर गीता सतरकर, आरती गावडे अनुक्रमे दुसरी तिसरी
Chess Game
Chess GameDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: कुर्टी-फोंडा येथील अजिंक्य चेस अकादमीने ए-आर ट्युशन क्लासेस व फोंडा तालुका बुद्धिबळ संघटना यांच्या सहकार्याने घेतलेल्या प्रशिक्षणार्थींच्या बुद्धिबळ स्पर्धेत सनम गावडे याने अव्वल क्रमांक मिळविला. गीता सतरकर, आरती गावडे, तन्वी गावडे व चिन्मय गावडे यांना अनुक्रमे दुसरा ते पाचवा क्रमांक मिळाला. ( Sanam Gawde tops in chess tournament at Kurti-Fonda)

प्रशिक्षण शिबिर कुर्टी येथील श्रीकृष्ण मंदिर संकुलात झाले. बक्षीस वितरण फोंडा तालुका बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष सागर साकोर्डेकर, अजिंक्य चेस अकादमीचे प्रमुख रवींद्र कुर्टीकर, ए-आर ट्युशनचे प्रमुख आनंद कुर्टीकर, बुद्धिबळ प्रशिक्षक मिलिंद गावडे, व्रजेश नाटेकर यांच्या उपस्थितीत झाले. एकूण १५ महिला स्पर्धकांसह १८ जणांनी शिबिर-स्पर्धेत भाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीक्षा केरकर यांनी केले.

Chess Game
'...म्हणून पाकिस्तानी क्रिकेटपटूने केला आत्महत्येचा प्रयत्न,' प्रकृती चिंताजनक

मिताली राजनंतर रुमेली धरने वयाच्या 38 व्या वर्षी क्रिकेटला केला अलविदा

भारतीय महिला क्रिकेट संघाची पूर्व कर्णधार मिताली राजनंतर आता रुमेली धरने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 38 वर्षीय रुमेलीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन तिच्या 15 वर्षांच्या क्रिकेट करिअरला अलविदा केला. धरने 2003 मध्ये इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.

रुमेली धरने भारतासाठी चार कसोटी, 78 एकदिवसीय आणि 18 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. 2009 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या T20 विश्वचषक स्पर्धेत ती भारतासाठी सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज होती, ज्यामध्ये तिने 4 सामन्यात 6 विकेट घेतल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ishan Kishan Breaks 8 Year T20 Record
Small Savings Scheme Interest Rates Q3 2026
India Beats Pakistan 4-3 In Hockey
Ruhani Sharma Virat Kohli sister in law
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com