Misbah-ul-Haq resignation Pakistan selection committee Dainik Gomantak
क्रीडा

Pakistan Cricket: कोच पळाले, खेळाडू काढले अन् आता सिलेक्टर्सचा राजीनामा! मोहसीन नक्वींच्या नोटीसने पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ; लॉर्ड्स पराभवानंतर तिळपापड

Pakistan Cricket Controversy: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दारुण पराभवाचा सामना करत असलेला पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या भीषण विवादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

Manish Jadhav

Pakistan Cricket Controversy: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दारुण पराभवाचा सामना करत असलेला पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या विवादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. लॉर्ड्स कसोटीतील लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एकाच वेळी तब्बल 7 खेळाडूंना संघातून बाहेरचा रस्ता दाखवला. या अभूतपूर्व कारवाईने क्रिकेट जगतात खळबळ उडाली असतानाच, संघाचे मुख्य प्रशिक्षक सर्फराज अहमद आणि गोलंदाज प्रशिक्षक उमर गुल हे देखील मालिका अर्ध्यावर सोडून मायदेशी परतले आहेत. यामुळे पाकिस्तान क्रिकेटमधील अंतर्गत कलह आणि अराजकता पुन्हा एकदा जगासमोर आली.

परिस्थिती इतक्यावरच थांबलेली नाही, तर या संपूर्ण नाट्यात आता आणखी एक नवा ट्विस्ट आला आहे. इंग्लंडविरुद्धच्या या महत्त्वाच्या कसोटी मालिकेसाठी मोहम्मद रिझवान आणि इमाम उल हक या दोन वरिष्ठ खेळाडूंची निवड का करण्यात आली होती? असा सवाल क्रिकेट चाहत्यांसह आता थेट पीसीबी (PCB) विचारत आहे. संघाची ही ढासळलेली अवस्था पाहून पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी प्रचंड संतापले असून त्यांनी निवड समितीला चांगलेच धारेवर धरले आहे. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, 31 ऑगस्ट रोजी पीसीबीने निवड समितीच्या सदस्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

या नोटिशीमध्ये मोहम्मद रिझवान आणि इमाम उल हक यांच्या नावांची शिफारस कसोटी संघासाठी नेमक्या कोणत्या निकषांवर आणि कारणांमुळे करण्यात आली होती, याचे स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. सततचे पराभव, प्रशिक्षकांची माघार आणि आता निवड समितीवर झालेली कारवाई यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डात सध्या प्रचंड उलथापालथ सुरु आहे. येत्या दिवसांत या प्रकरणी आणखी काही कठोर निर्णय घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

8th Pay Commission Update: सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष मुंबईच्या बैठकीकडे! सॅलरी वाढीबाबत काय आहे नवा प्लान? 8व्या वेतन आयोगाचे 5 मोठे हायलाइट्स

SCROLL FOR NEXT