Cricket players Dainik Gomantak
क्रीडा

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जेवणाच्या फोटोवरुन होतंय 'ट्रोल'

दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या जेवणाच्या मेनूमध्ये मसूर आणि रोटीचाही समावेश करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियन संघ 24 वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळत आहे. रावळपिंडी येथे दोन्ही देशांमधील पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कराचीमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या जेवणाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या जेवणाच्या मेनूमध्ये मसूर आणि रोटीचाही समावेश करण्यात आला आहे. त्याचा फोटो स्वत: मार्नस लॅबुशेनने शेअर केला आहे. त्याने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले – दुपारच्या जेवणासाठी दाल रोटी… जेवण खूप चवदार आहे.

हा फोटो सोशल मीडियावर येताच लोकांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि लबुशेन यांना ट्रोल केले. काहीजण या जेवणाचा तुरुंगाशी संबंध जोडत आहेत तर काहीजण याला हॉस्पिटल फूड म्हणत आहेत. काही सोशल मीडिया यूजर्स लिहितात, पाणी मसूर आणि कच्चे नान दिले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: ''पाटकरांनी जबाबदारी घेतली नाही'',वीरेश बोरकर यांचा आरोप; काँग्रेसच्या 'उद्या'मुळे युतीचा खेळ खल्लास

एअरपोर्टवर हायव्होल्टेज ड्रामा! इंडिगोचं विमान अचानक रद्द, संतापलेल्या विदेशी महिलेनं काउंटरवर चढून केला राडा Watch Video

नवरा भाड्याने पाहिजे! पुरुषांची संख्या कमी झाल्याने ‘या’ देशातील महिला त्रस्त; तासावर मोजले जातायेत पैसे

Goa Live News: गोवा संघानं जम्मू-काश्मीरचा 7 विकेट्सनं केला पराभव

आलिशान बंगला, महागड्या गाड्या अन् बरच काही! बुमराह, जडेजा, अय्यर... कोणाची लाईफस्टाइल सर्वात 'रॉयल'? तिघांची नेटवर्थ ऐकून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT