Shaheen Afridi Dainik Gomantak
क्रीडा

Pakistan Cricket: शाहीन आफ्रिदीला भरला दम, पाक क्रिकेटमधील गोंधळानंतर नवा फर्मान

Shaheen Shah Afridi: न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. व्यवस्थापन समितीतही बदल करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

Pakistan Cricket Board to Players: न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. व्यवस्थापन समितीतही बदल करण्यात आला आहे. इतकेच नाही तर माजी अष्टपैलू शाहिद आफ्रिदीला मुख्य सिलेक्टर्स बनवण्यात आले आहे. दरम्यान, नवीन व्यवस्थापनाने खेळाडूंसाठी नवा फर्मान जारी केला आहे. शाहीन शाह आफ्रिदीने डिलीट केलेले ट्विट केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

सर्व खेळाडू कराराचे पालन करतात

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) नवीन व्यवस्थापन समितीने केंद्रीय करार असलेल्या खेळाडूंना स्पष्टपणे सांगितले आहे की, त्यांना त्यांच्या करारातील तरतुदींचे पालन करावे लागेल. यामध्ये कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. जाणकार सूत्रांनी सांगितले की, शाहीन शाह आफ्रिदी, हारिस रौफ आणि शाहनवाज दहानी यांना स्पष्टपणे सांगितले आहे की, पाकिस्तान संघाच्या कर्णधारपदाबद्दल ट्विट करणे हे त्यांचे काम नाही.

शाहीनने ट्विट केले होते

युवा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीशिवाय हारिसने बाबर आझमला (Babar Azam) कर्णधारपदी ठेवण्याच्या समर्थनार्थ ट्विट केले. बाबरला हटवण्याचा विचारही करु नये, असा इशारा त्याने दिला होता. शाहीनने नंतर ते ट्विट डिलीट केले, परंतु पीसीबीने त्याला पुन्हा असे न करण्यास सांगितले आहे. नजम सेठी यांच्या नेतृत्वाखालील बोर्डाच्या नवीन व्यवस्थापनाने खेळाडूंना सांगितले आहे की, त्यांचे काम क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणे आणि चांगली कामगिरी करणे आहे.

रमीझ यांनी सूट दिली

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलेला माजी क्रिकेटपटू रमीझ राजा यांनी खेळाडूंना बरीच सवलत दिली होती. पाकिस्तानचे खेळाडू सोशल मीडियावर खूप सक्रिय होते. आता त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, क्रिकेट बोर्डाशी संबंधित मुद्द्यांवर कोणतेही वक्तव्य करु नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: 'पाकिस्तान झिंदाबाद' फलक प्रकरणी बजरंग दल आक्रमक; तक्रार दाखल

'गोवा गुन्हेगारांसाठी आश्रयस्थान, नागरिकांसाठी मात्र असुरक्षित', LOP युरींचे टीकास्त्र; कायदा व सुव्यवस्था विषयावर अधिवेशन बोलवण्याची मागणी

Goa ZP Election: आरक्षित मतदारसंघांची यादी जाहीर! कवळेकर समर्थकांना धक्‍का, काब्राल समर्थकाला दिलासा; फोंड्यात महिलाराज

Goa Road Diversions: ‘आयर्नमन 70.3’ मुळे गोव्यात वाहतूक मार्गात बदल! पर्यायी रस्ते कोणते? जाणून घ्या..

Kala Academy: 'कला अकादमीच्या दुरुस्तीचे लेखापरीक्षण, चौकशी करा'! कला राखण मांडची मागणी; सचिवांशी विविध विषयांवर चर्चा

SCROLL FOR NEXT