Pakistan Cricket Board Chief Zaka Ashraf Resigns Dainik Gomantak
क्रीडा

Pakistan Cricket Board: पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप, आता अध्यक्ष झका अश्रफ यांचा राजीनामा!

Pakistan Cricket Board Chief Zaka Ashraf Resigns: पाकिस्तान क्रिकेट बोर्डात सध्या काहीही चांगले चालले नाही.

Manish Jadhav

Pakistan Cricket Board Chief Zaka Ashraf Resigns: पाकिस्तान क्रिकेट बोर्डात सध्या काहीही चांगले चालले नाही. सुमारे 4 महिन्यांपूर्वी पीसीबीचे अध्यक्षपद स्वीकारलेले झका अश्रफ यांनीही आज (शुक्रवारी) संध्याकाळी राजीनामा दिला. 19 जानेवारीच्या संध्याकाळी अचानक त्यांच्या राजीनाम्याची बातमी सोशल मीडियावर पसरली. यापूर्वी गुरुवारी मिकी आर्थरसह तिन्ही एनसीए प्रशिक्षकांनी राजीनामा दिला. याआधीही विश्वचषकानंतर मुख्य प्रशिक्षक आणि संचालक मिकी आर्थर यांना त्यांच्या पदावरुन हटवण्यात आले होते. तर इंझमाम उल हकने मुख्य सिलेक्टर्स पद सोडले होते.

दरम्यान, आशिया चषकापासून पाकिस्तान संघात सर्व काही ठीक चाललेले नाही. विश्वचषकादरम्यानही प्रचंड गोंधळ उडाला होता. यानंतर राजीनाम्यांची मालिकाच सुरु झाली. कॅप्टन बाबर आझम याने आपले पद सोडले. मिकी आर्थर यांनी डायरेक्ट पद सोडले. गुरुवारीच तीन राजीनामे एकत्र आले. आशिया चषकापूर्वीच नजम सेठी यांच्या जागी झका अश्रफ यांनी हे पद स्वीकारले होते.

पंतप्रधानांशी चांगले संबंध होते

मिळालेल्या माहितीनुसार, झका अश्रफ हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे जवळचे मानले जात होते. पण सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान अन्वर उल हक काकर आहेत. शाहबाज यांनी ऑक्टोबरमध्ये आपल्या राजीनामा दिला. पाकिस्तानमध्ये पंतप्रधान बदलताच तेथील क्रिकेट बोर्डही बदलते, असे अनेकदा सांगितले जाते. इम्रान खान यांच्या कार्यकाळात रमीझ राजा हे प्रमुख होते. त्यानंतर नजम सेठी आले, त्यानंतर झका अश्रफ यांनी जबाबदारी घेतली.

दुसरीकडे, गेल्या वर्षभरात पीसीबीचे तीन प्रमुख बदलले आहेत. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, राजीनामा दिल्यानंतर झका अश्रफ म्हणाले की, ''मी नेहमीच पाकिस्तान क्रिकेटच्या हिताचा विचार करुन काम केले आहे. पण आता मला असं काम करणं शक्य नाही. आता ते माझ्या जागी कुणाला निवडतील हे पंतप्रधान काकर यांच्यावर अवलंबून असेल.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दिमाखात होणार St. Francis Xavier Exposition, येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत कामे लागणार मार्गी; मुख्यमंत्र्यांची माहिती

Goa Live Updates: माजी क्रिकेटपटू आशिष नेहराचे एनडीझेड भागात अनधिकृत रस्ते बांधकाम; पंचायतीने बजावली नोटीस

गोवा शासनात नोकरी मंत्री-आमदाराच्या 'मेहेरबानी'ने की उमेदवाराच्या 'गुणवत्ते'वर?

Ashish Nehra: आशिष नेहराला धक्का; केळशी पंचायतीने पुन्हा बजावली नोटीस

आपल्या सुंदर, ‘सोबीत’ गोव्याला प्रदूषणरहित ठेवणे आपल्या सगळ्यांच्या हातात आहे

SCROLL FOR NEXT