PCB Ask Compensation To ICC: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे अजब मागणी केली आहे. यामुळे क्रिकेट जगताला धक्का बसला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडेच नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
विशेष म्हणजे, पाकिस्तानने भारतीय क्रिकेट संघाचा हवाला देत नुकसान भरपाई मागितली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये होणार आहे. ही आयसीसी स्पर्धा पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेपूर्वी पीसीबीने आयसीसीकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण...
दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे आयोजन पाकिस्तानमध्ये होणार आहे. पाकिस्तानच्या यजमानपदी होणाऱ्या आयसीसी स्पर्धेत खेळणे भारतीय संघासाठी सर्वात कठीण असेल. भारतीय संघाला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाकिस्तानात जायचे नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पाकिस्तानने केले तर आम्ही खेळायला जाणार नाही, असे भारतीय संघाचे म्हणणे आहे. भारतीय संघाने आयसीसी स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानात जावे असे सरकारलाही वाटत नाही.
याबाबतच आता पीसीबीने आयसीसीकडे (ICC) मागणी केली आहे की, जर भारत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये येत नसेल तर त्याची भरपाई पीसीबीला मिळावी.
आशिया चषक 2023 चे यजमानपदही पाकिस्तानकडे होते, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये सामना खेळण्यास नकार दिला होता. भारतीय संघाने सुरक्षेचे कारण देत खेळण्यास नकार दिला होता, त्यानंतर भारताचे सामने श्रीलंकेत झाले.
अशा स्थितीत पुन्हा एकदा पाकिस्तान (Pakistan) चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषवणार आहे, तेव्हा भारत पाकिस्तानमध्ये न गेल्यास सामने दुसऱ्या देशात होऊ शकतात. यामुळे पाकिस्तान संतापला आहे. जेव्हा आपण विश्वचषक खेळण्यासाठी भारतात येऊ शकतो, तर भारत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये का येऊ शकत नाही, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.